Yeola News | पालखेड कालवा परिसरातील वीजपुरवठा सूरळीत करा; भुजबळांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना 

0
45
Yeola News
Yeola News

Yeola News | येवला : यंदा राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळजन्या परिस्थिती निर्माण झाली असून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात डिसेंबर महिन्यातच ट्रॅंकरने पाणापुरवठा करण्याची वेळ आली आहे. यातच पालखेड डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आलेले आहे.

Malegaon News | …. यामुळे पालकमंत्र्यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी

पालखेड डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले असले मात्र पाणी सोडल्यानंतर पालखेड कालवा परिसरातील गावांमध्ये दररोज २१ तास वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काढले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून पालखेड कालवा परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

त्यामुळे याभागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा सूचना राज्याचे अन्न वनागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.आमले यांना देण्यात आलेल्या आहेत.

Sudhakar Badgujar | सुधाभाऊंची आज ‘मोठी’ चौकशी; काय खुलासे होणार..?

Yeola News | मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

पालखेड कालव्यातून शेतीच्या सिंचनासाठी आवर्तन सोडल्यानंतर पालखेड कालवा परिसरातील गावांमध्ये दररोज २१ तास वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काढले होते. त्यानुसार दिंडोरी, निफाड तसेच येवला तालुक्यातील सुमारे ६५ हून अधिक गावांतील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला होता.

यंदाच्या वर्षी नाशिक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. आमले यांना दूरध्वनीवरून सूचना देत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केलेल्या आहे. त्यानुसार खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा हा सुरळीत करण्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here