येवला प्रतिनिधी: स्मार्ट इंडिया इंस्टीट्यूट येवला व इंडिया अँग्रो फाऊंडेशन संचलित नाशिक मशरूम फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे युथ इन्स्पीरेशन समिट 2022 चे आयोजन करण्यात आले होते.
अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात विशेष सहभाग नोंदविला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अश्या व्यक्तिमत्व विषयक शिबिरामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे,या शिबिरातून मिळणारा प्रेरणाचा स्रोत आपल्या सर्वानाच नवी उंची गाठण्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ भाऊसाहेब गमे यांनी केले.या एकदिवसीय शिबिरामध्ये तीन प्रमुख वक्त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .कोल्हापूर विद्यापीठाचे सिनेत सदस्य सुप्रसिद्ध व्याख्याते मधुकर दादा पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मनोहर भोळे, प्रेरणादायी वक्ते प्रशिक्षक अमोल दरेकर यांनी तीन सत्रामध्ये मार्गदर्शन केले.
यावेळी पत्रकार गणेश जगदाळे, येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, स्टडी सर्कल येवला संचालक शैलेंद्र पंढोरे ,ज्ञानसागर क्लासेस चे संचालक सचिन लभडे, उद्दोजक अमित पटेल, राष्ट्रीय सेवा योजना येवला तालुका समन्वयक प्रा.अक्षय बळे, अँड अतुल लोंढे, सचिन जाधव, मयूर पवार, वैभव कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या सत्रात मधुकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. आपण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दृष्टी सह दूरदृष्टी असली पाहिजे, घरामधील संवाद आज कमी झालेला आहे त्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असून आयुष्यामध्ये अडचणी प्रत्येकालाच आहे , उसन मागायला लाजू नका पण माझ्या बांधवांनो तुमच्या पायाखालची वाट मात्र उसनी घेऊ नका असे दादांनी सांगताच उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांची दाद दिली. आयुष्य घडण्याच्या या काळात वाचलेली पुस्तक आणि भेटलेली माणस तुम्हाला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याची क्षमता ठेवता असेही त्यांनी सांगितले.दुसऱ्या सत्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मनोहर भोळे यांनी मार्गदर्शन केले, स्पर्धा परीक्षा देत असताना योग्य मार्गदर्शन दर्जेदार साहित्य, सदर परीक्षेचा अभ्यासक्रम, अभ्यासासाठी अनुकूल जागा या बाबी महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. वेळेचे योग्य नियोजन, मानसिक स्वास्थ्यासह, शारीरिक स्वास्थ्य गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्पर्धा आहे यास सामोरे जात असताना सातत्य ,संघर्ष ,धाडस महत्वाचे आहे असे भोळे म्हणाले, यानंतर त्यांनी विद्यार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
तिसऱ्या सत्रात उद्दोजक व ट्रेनर अमोल दरेकर यांनी व्यक्तिमत्व विकास तसेच उद्दोग व्यवसाय उभारणी करत असताना अधिक अभ्यासू पद्धतीने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल आमच्या प्रगतीच साधन बनावं अधोगतीच नव्हे ,स्वप्न पाहायला पैसे लागतात का ? ब्रँडेड कपडे गाडी घड्याळ वापरण्यास आम्ही प्राध्यान्य देतो मग ब्रँडेड विचार का नोकोत असे प्रश्न त्यांनी व्यासपीठावरून विद्यार्थ्यांमध्ये जात त्यांना विचारले. येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी नेतृत्व हे प्रत्येक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावते आपल्याला विद्यार्थी दशेत कदाचित प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागेल पण हार मानू नका असे गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी ज्या विद्यार्थी कोअर कमिटीने हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रतीक्षा सोनवणे, प्रांजल बाबर, ऋतुजा डुंबरे, आश्विनी मढवई, प्रीती जाधव, एश्र्वर्या जाधव, ऋत्विक डोळस, यश गंगवाल प्रियंका सोनवणे ओम गायकवाड, सागर वाघ, कुणाल निकम, निकिता आरखडे, शैला गायकवाड, सचिन पडोळ, समाधान शिंदे, निखिल गायकवाड, वैभव लेकुरवाळे, ओमकार कोकाटे, प्रेरणा पाणपतील, आकांक्षा संसारे, शेख सेहबाज, सायली बारहाते, दीपक वाघ, श्लोक काळे, निकिता वावधने, अर्पिता पडोल, सचिन पडोळ, यांचा सन्मान करण्यात आला. तेजश्री लसूरे, समाधान कोटमे, सागर घोडेराव, सागर वाघ, जनार्दन गायकवाड यांनी संयोजन केले. प्रांजल बाबर, ऋतुजा डुंबरे यांनी सूत्रसंचालन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम