Yellamma Devi | देशातील तृतीयपंथी तसेच जोगतीण यांचे आराध्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरी झाली. चोरट्यांनी देवीच्या चांदीच्या मूर्ती तसेच पादुकांसह तब्बल १० लाख किंमतीचे दागिने लंपास केले असल्याचे उघडकीस आले आहे.(Yellamma Devi)
चोरीची ही घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आता सविस्तर तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ह्या चोरांचा सोध घेत त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ तसेच भाविकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे आता समस्त भविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.(Yellamma Devi)
महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश ह्या राज्यां मधील तृतीयपंथी तसेच जोगतीण यांचे आराध्य देवस्थान म्हणून तसेच जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या कासेगाव येथील ‘यल्लम्मा’ देवीच्या मंदिरात आज पहाटेच्या दरम्यान चोरी झाल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
Pune News | बॉसने Whatsapp ग्रुपमधून काढलं; कर्मचाऱ्याने त्याला बांबूने झोडपलं
दरम्यान, चोरांनी देवीची चांदीची मूर्ती, चांदीच्या पादुका, चांदीची प्रभावळ असे तब्बल १० लाख किंमतीचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेने भाविक भक्तांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्र फिरवत चोरट्यांना ताब्यात घ्यावे आणि देवीचे ऐवज शोधावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(Yellamma Devi)
रात्रीच्या सुमारास दोन वाजेनंतर पुजाऱ्याच्या घराला बाहेरून कड्या लावण्यात आल्या व मागील दाराने आत येऊन चोरांनी दोन्ही दरवाज्याची कुलुपे तोडून मंदिराच्या आत प्रवेश केला. या अज्ञात चोरांनी पहाटेच्या दरम्यान ही चोरी केल्याचे मंदिराचे पुजारी मुकुंद जाधव यांनी सांगितले असून, आज पहाटे पाच वाजता पुजारी हे मंदिरात आल्यावर त्यांना या चोरीच्या घटनेचा उलघडा झाला. त्यानंतर तातडीने पुजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस हे घटनास्थळी पोहचले.(Yellamma Devi)
Nagpur | कॉँग्रेसचे ठिय्या आंदोलन; नानांना पोलिसांनी उचलून नेले
गेल्या काही दिवसांपासून मंदिराचे सीसीटीव्ही देखील बंद आहेत. यात्रेपूर्वी हे सीसीटीव्ही दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचे ठरलेले होते. पण, त्या पूर्वीच ही चोरी झाल्यामुळे कासेगाव ह्या परिसरात संतापाची एकच लाट उसळली आहे. पहाटेच्या दरम्यान सध्या कडाक्याची थंडी पडत असल्याने चोराने याचा फायदा घेतला असून, अतिशय जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या ह्या ‘यल्लम्मा’ देवी मंदिरात झालेल्या ह्या चोरीच्या घटनेमुळे संबंधित पोलीस खातेही खडबडून जागे झाले आहेत. दऱ्यां, पोलिसांनी तपासासाठी विविध पथकेही तयार केली आहेत.(Yellamma Devi)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम