Sparrow Day | चिऊताई चा चिवचिवाट पुन्हा जागृत करूया… रोज दाणा – पाणी देऊया…

0
11
Sparrow Day
Sparrow Day

वैभव पगार (दिंडोरी) :
आज २० मार्च, हा दिवस जगभरामध्ये ‘जागतिक चिमणी’ दिवस म्हणून पाळला जातो आहे. ह्याची सुरुवात (दि. २०) मार्च २०१० पासून झाली. दिवसेंदिवस होणारी चिमण्यांच्या संख्येतील घट ही चिंतेची बाब ओळखून चिमणी संवर्धनाचा जागर करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. “चिमणी” हा भारतात सर्वाधिक परिचयाचा व सर्वत्र आढळणारा पक्षी. त्याचे वैज्ञानिक नाव Passer domesticus आहे. माणसाच्या सर्वात जवळ राहणारा तसेच लहान बाळाला सर्वात आधी माहिती होणारा पक्षी म्हणजे चिमणी होय. पूर्वी व आताही खेड्यात पहाटे होणारा चिमण्यांचा चिवचिवाट मन प्रसन्न करतो. चिमण्यांना दाणे टाकणे, पाणी देणे हे शुभ कार्य मानले जाते. ह्या पक्षाचा वीनीचा म्हणजे घरटे बांधण्याचा हंगाम असा ठराविक नाही. वर्षभर जिथे जागा मिळेल तिथे चिमणी आपले घरट बांधत असते.

त्यासाठी गवत, काड्या, कापूस, पिसे ह्यांच्या साह्याने चिमणी आपले घरटे मध्यम उंचीची झाडे, घरांचे छत, कौलारू घरांची आढे, वळचनीच्या जागा, ह्या ठिकाणी बांधत असते. छोटासा दिसणाऱ्या ह्या जीव हा माणसाला उपयुक्त आहे कारण तो किडे खातो. चीनने १९५८-६२ च्या दरम्यान चार कीटक मोहीम राबवली. त्यात त्यांनी पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजेच उंदीर, माश्या, डास आणि चिमण्या हे चार कीटक नष्ट करायचे ठरवले. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सुरू झालेल्या या चिमण्या मारण्याच्या अभियानामुळे चीनमध्ये चिमण्या जवळ जवळ संपुष्टात आल्या. ज्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला. पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरात, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव निर्माण झाली. जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या २६ पैकी फक्त २३ चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत.

चिमण्यांची संख्या घटण्याची कारणे –

वीज, मोबाईलमधुन येणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे चिमणीच्या आणि इतर पक्षी यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. शेतात होणाऱ्या रासायनिक फवरण्यांमुळे ही चिमण्यांची संख्या कमी होत आहे. जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांमद्ये तसेच भिंतीवर चिमण्या घरटी बांधू शकत होत्या. परंतु सिमेंट काँक्रीट व उंच इमारती पद्धती मुळे घरटी बांधण्याच्या जागा कमी झाल्याने परिणामी संख्या घटत आहे. चिमण्यांना पिण्यासाठी पाणथळ उपलब्ध नसल्याचा परिणाम ही संख्या घटण्यात आहे.

आपण काय करू शकतो

जिथे चिमण्या आहेत अश्या ठिकाणी रोज धान्य (शक्यतो तांदूळ, बाजरी) टाकणे. तसेच त्या ठिकाणी पाण्याची छोटी छोटी भांडी भरून ठेवणे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here