Molestation : नाशिकच्या पांडवलेणी भागात किरकोळ कारणातून एका महिलेस बेदम मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. एकमेकांच्या शेजारी राहणा-या शेजा-यांचा वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांविरूध्द विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
https://thepointnow.in/the-guardian-minister-gave-instructions/
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी किसन बस्ते, नंदू किसन बस्ते, मनिषा रवी बस्ते व पायल नंदू बस्ते (रा.सर्व बस्ते मळा,पांडवलेणी पायथ्याशी) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित आणि पीडिता एकमेकांचे शेजारी असून, घराबाहेर पडलेली चप्पल तोडल्याच्या संशयातून हा वाद झाला. बुधवारी (दि.१९) पीडिता आपल्या घरात एकटी असतांना संशयितांनी चप्पल तोडल्याच्या संशयातून शिवीगाळ केली. यावेळी पीडित महिलेने समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी तिला मारहाण केली. तर दोघा भावांनी तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम