Winter Session | उद्या हिवाळी अधिवेशन; आज नाट्यमय घडामोडी

0
11

Winter Session |  उद्या (दि. ७ डिसेंबर) रोजी विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) हे सुरु होणार आहे. अधिवेशनासाठी विरोधकांनीही आपली रणनिती तयार करण्यास सुरुवात केली आहे. ह्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आज दुपारी तीन वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. ह्या पत्रकार परिषदेच्या आधी महाविकास आघाडीची एक बैठकही होणार आहे. ह्या बैठकीत अधिवेशनाची स्ट्रॅटर्जी ही ठरवली जाणार आहे तसेच चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या संदर्भात निर्णयही घेतला जाईल.

 ‘मुंबई’ मुळे नागपुरात राडा

 मुंबई महापालिकेवरून ठाकरेआणि शिंदें यांच्यात जोरदार खडाजंगी असल्याचे दिसत आहे. काल उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या निवडणुका व कंट्रादारांवरून शिंदेवर टीका केली. दरम्यान, या अधिवेशनातही कोविड मधील घोटाळे, रस्ते घोटाळे, नाले सफाईचे घोटाळे व खिचडीच्या घोटाळ्यांवर चौकशीही लावण्याची मागणी विरोदही पक्ष हे करत असून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनिती यादरम्यान आखली जात आहे. मागील अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या नेत्यांच्या विविध घोटळ्यांच्या  चौकशा सुरू असून, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचे (Winter Session)  युद्ध हे मुंबईवर गाजणार हे नक्की.

Job Alert | ZP शाळांमध्ये शिक्षकांची भरती सुरु; ईडब्ल्यूएस मधूनही उमेदवारांना संधी

 विरोधकांकडून विमानतळावर बॅनर

 हिवाळी अधिवेशनाला उद्या सुरुवात होत असून, त्यासाठी आजपासून विविध आमदारांच्या आगमनाला नागपुरात सुरुवात होत आहे. “यंदा अधिवेशन हे अवघ्या दहा दिवसांचे असून, त्यात येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत” हे अशा आशयाचे बॅनर नागपूर विमानतळावर लावलेले आहेत. विदर्भात होणारे अधिवेशन हे किमान सहा आठवड्यांचे असावे अशी मागणी ही होत असते.

विरोधी बाकांवर असताना, प्रत्येक पक्ष हा किमान तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे, असा आग्रह धरत असतो. यंदा ७ ते २० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या ह्या अधिवेशनात फक्त दहा दिवसच कामकाज होणार असल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दहा दिवसांच्या अधिवेशनाची (Winter Session) जोरदार खिल्ली उडवण्यासाठी थेट विमानतळावर तेही प्रत्येकाच्या नजरेस पडेल अशा दर्शनी भागात हे बॅनर लावण्यात आलेले आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन

  हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) उद्या सुरुवात होत असून, त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राज्य मंत्रीमंडळाची बैठक ही आयोजित केलेली आहे. त्याआधी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर चहापानाचा कार्यक्रम हा पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या आमदारांना आमंत्रण दिलेलं आहे. दरम्यान, ह्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची तयारी विरोधी पक्षाच्या गोटात सुरू आहे. यासंदर्भात आज विरोधी पक्षांची बैठक तसेच पत्रकार परिषधी पार पडणार आहे.

Maratha Reservation | आज मराठ्यांचे भवितव्य ठरणार; दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here