Political : नाशिकला मिळणार नवीन पालकमंत्री?

0
45

Political महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सर्वसामान्यांना रोजच नवीन धक्का बसत आहे. आता शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील उभी फूट पडली आहे.दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी नऊ जणांसह मंत्रीपदाची शपथ घेतली, यामध्ये नाशिकचे दिग्गज नेते व माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचा देखील समावेश होता. यामुळे पुन्हा एकदा नाशिकचे पालकत्व पुन्हा छगन भुजबळ यांच्याकडे येणार असल्याच्या चर्चांना उधाण आल आहे. (Political) भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांना यामुळे कोणता जिल्हा भेटणार याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.

2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी त्यांचा पराभव केला यानंतर 2019 च्या निवडणुकीत सुद्धा सलग दुसऱ्यांदा खासदार खासदारकीची माळ गोडसे यांच्या गळ्यात पडली 2019 मध्ये गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा दारुण पराभव केला होता. (Political) तर आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भुजबळ परिवारातील सदस्य इच्छुक उमेदवार असल्याचे वातावरण निर्माण झाल आहे. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्याने भुजबळ कुटुंबियांच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी मध्ये अडचण निर्माण झाली होती. भाजपा शिवसेना युतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेकडे गेली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हेमंत गोडसे हे शिंदे गटात सामील झाले आहेत त्यामुळे ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला उभे केले तरी नाशिक लोकसभा मतदारसंघातून तो खासदार होईल असा दावा करत विजय करंजकर यांच्याकडे कल दाखवला होता. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना नाशिक लोकसभेची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट होतं आहे.

यातच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत थेट शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला यात छगन भुजबळ हे देखील सामील असल्याने प्रत्यक्षपणे नाशिक लोकसभेच्या जागेवरील चढाओढ आणखीनच जिकरीची होणार आहे. यात जर महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक उतरली तर नाशिकची जागा कोण लढणार हे स्पष्ट झालं नसलं तरी मात्र ठाकरे गट नाशिकची जागा सोडायला तयार नसल्याचं याआधी अनेकदा स्पष्ट झाल आहे.

 

दुसरीकडे नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस व अजित पवार गटात झालेल्या युतीमुळे छगन भुजबळ नाशिक मधून आगामी निवडणुका लढवतील की शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार की भाजप आपला उमेदवार नाशिक मधून देणार असा मोठा पेच निर्माण झाला आहे.(Political) यातच आता खाते वाटपा दरम्यान कुणाच्या वाट्याला कुठलं मंत्रीपद येतं हे बघणं जितकं महत्त्वाचं असेल तितकंच नाशिकला नवीन पालकमंत्री मिळणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम कधी लागणार याच देखील कुतूहल सर्वसामान्यांमध्ये बघायला मिळत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here