Nashik News | बाळाला बाहेर नेल्यावरून जाब विचाराल्याने पत्नीचा खून

0
45
Latur Crime
Nashik Crime News

Nashik News | नाशिकमध्ये नऊ महीन्याच्या दुधपित्या बाळाला सकाळपासुन बाहेर घेउन गेलेल्या पतीला घरी आल्यावर त्याच्या पत्नीने जाब विचाराल्याचा राग आल्याने धारदार शस्राने पत्नीचा खून केल्याची घटना शहरातील गंगादरवाजा या भागात घडली आहे.

या घटनेबाबत मृत महिलेचे वडील केदारनाथ खैरनार यांनी नाशिक शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी बाळू जाधव हा मूळ पाथर्डी येथील रहिवासी असून पाथर्डी या ठिकाणी घर नसल्याने सुमारे पाच महिन्यांपूर्वी महिलेच्या वडिलांनी पती-पत्नीला गंगादरवाजा येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ कोपीचे घर राहण्यासाठी दिलेले होते. आरोपी बाळू आपल्या नऊ महिन्यांच्या लहान बाळाला सकाळपासुन कोठेतरी घेउन गेलेला होता.

तो दारू पिऊन लहान बाळाला परत घरी घेउन आला असता त्याची पत्नी अर्चना हिने तुम्ही दुध पित्या इतक्या लहान बाळाला सकाळ पासून कोठे घेऊन गेला होता असे विचारले होते.

Nashik news | तरुणीने लग्नास नकार दिल्याने नाशकात वाहनांची केली जाळपोळ

पण, याचा राग आल्याने बाळूने पत्नीला शिवीगाळ करून तिला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने स्वयंपाकाच्या खोलीत पडलेला चाकु हातात घेउन पत्नी अर्चनाच्या गळ्यावर, दंडावर चाकुने वार करून तिला गंभीर जखमी केले.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी जखमी महिलेला येवला येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. पण, रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने जखमी महिलेला पुढे नाशिक येथे हलवण्यात आले असता, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.

याबाबत संशयित आरोपी बाळू शंकर जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक सुरज मेढे हे करीत आहेत.

रेल्वेभरती | कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कसा करावा अर्ज?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here