Murder – जायखेडा (बागलाण) येथे प्रियकरासह मिळून पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या

0
8

Extra Marital Affair & Murder – प्रेमसंबंध हा विषय आज अतिशय गंभीर असाच मानला जातो आहे. कारण या प्रेम संबंधांच्या कारणाने मागील काही काळात बऱ्याच जणांना काही ना काही कारणाने आपला जीव गमवावा लागला. अर्थात, त्यांची हत्या झाली.

आता नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

8 तासात पोलिसांनी केला गुन्ह्याचा उलगडा!

लाडुड येथील दत्तात्रय राजाराम ठाकरे यांचा मृतदेह नुकताच जायखेडा पोलिसांना जायखेडा येथील नदीकाठी आढळून आला. त्यांच्या शरीरावर जखमांचे निशाण दिसत होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व अवघ्या 8 तासात गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना अटक केली आहे.

मृत दत्तात्रय ठाकरे

 

नदीकाठाजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेहाची ओळख पटवली. व त्यानंतर तपासाची चक्रे फिरवली.

Gas Cylinder – गॅस सिलिंडर दरात 200 रुपयांचा दिलासा

विवाहबाह्य संबंध आणि गुन्हा

सध्या विवाहबाह्य संबंध असण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातून अनेकांची संगनमताने हत्या झाल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे विवाहबाह्य संबंध हा विषय पुन्हा डोके वर काढू लागला आहे.

यात आत्तापर्यंतच्या घटनांमध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात महिला वर्गच अधिक दिसून आला आहे. अर्थात, विवाहबाह्य संबंधांपायी पत्नी व प्रियकराद्वारे पतीची हत्या करण्यात आल्याच्या वा भयानक दुखापत केल्याच्या अनेक घटनांनी विवाहबाह्य संबंधांवर विचार करण्यास भाग पाडले आहे.

बागलाण तालुक्यात घडलेल्या या घटनेने, विवाहबाह्य संबंधांचे हे पेव ग्रामीण भागात देखील पसरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बागलाण तालुक्यात घडलेल्या या घटनेतील मृत दत्तात्रय ठाकरे यांच्या खिशात सापडलेल्या औषधांच्या चिट्ठीवरुन त्यांची पोलिसांनी ओळख पटवली.

संगनमताने काढला अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा

या घटनेतील आरोपी पत्नी माधुरी ठाकरे (वय 25) हिचे नंदुरबार जिल्ह्याच्या आसने येथील भरत इलाचंद पाटील (वय 31) याच्याशी अनैतिक संबंध होते. आणि त्यांच्या या नात्यात पती दत्तात्रय ठाकरे अडथळा ठरत असल्याने, त्याची हत्या करण्यात आली. भरत पाटील याने दत्तात्रय ठाकरे यास दारू पाजून त्याची गळा दाबून हत्या केल्यानंतर, आसने येथीलच साथीदार राकेश पावबा सावळे याच्या साथीने दत्तात्रय ठाकरे यांचा मृतदेह फेकून देण्यात आला.

या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here