पुण्यातील उत्तमनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून चक्क ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची घटना घडलेली आहे. ४५ वर्षीय पतीने घृणास्पद कृत्य केलेले आहे. (धक्कादायक) पुण्यातील उत्तमनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची घटना घडलेली आहे.
Maratha Reservation | राज ठाकरे विरुद्ध मनोज जरांगे ह्या नव्या वादाला ठिणगी..?
पुण्यातील उत्तमनगरमधील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची घटना घडलेली आहे. याप्रकरणी आरोपी पती सोमनाथ सपकाळ (वय. ४५) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ४१ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ऑक्टोबर पासून सुरू होता. गेल्या २ महिन्यांपासून या दाम्पत्यामध्ये अनेक वादविवाद सुरू होते. सोमनाथ हा त्याच्या पत्नीवर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात कायम वाद होत होते. सोमनाथने अनेकदा पत्नीला शिवीगाळ करून मारहाण सुद्धा केलेली होती. काही दिवसांपूर्वी सोमनाथ आणि त्याचा भाऊ घरी दारू प्यायला बसलेले होते. यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि तेव्हाच सोमनाथने पत्नीची हत्या करण्याचे ठरवले होते, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
‘Bajaj CNG Bike’ ची पहिली झलक; दुचाकी झाली कॅमेऱ्यात कैद
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोमनाथने त्याच्या पत्नीला कॅल्शीअमच्या कॅप्सुल दिल्या होत्या यात पाहिले ब्लेडचे तुकडे टाकले आणि ते तिला खायला दिले. तसेच ते जबरदस्तीने गिळायला लावले, असा आरोप त्या महिलेने केलेला होता. फिर्यादीच्या गळ्यात जखमा झाल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि हा सर्व प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम