द पॉईंट नाऊ: दिवसेंदिवस प्रवाशांचे पसंती मिळत असलेल्या सिटीलिंक बससेवेकडून प्रवाशांची लूट होतांना दिसते. एकाच मार्गावर दोन वेगवेगळ्या बसमध्ये वेगवेगळे तिकीट दर आकारल्याने प्रवाशी व बसवाहकांमध्ये वाद होन्याचे प्रकार घडू लागले आहेत. याकडे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.श्रमिकनगर भागातील एका बांधकाम महिरावणी गावात काम घेतले होते. चारचाकी नादुरुस्त झाल्याने त्यांनी पपया नर्सरी येथील सिटीलिंक बससेवत बसून प्रवास केला. पहिल्या दिवशी २० रुपये तिकिटाचा दर आकारण्यात आला, तर दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणाहून महिरावणीला जाण्यासाठी वाहनकाने ३० रुपयांचे तिकीट दिले. घडलेल्या प्रकारावरून संतापलेला प्रवासी बांधकाम ठेकेदार याने एकाच ठिकाणी जाण्यासाठी दोन बसमध्ये वेगवेगळे तिकीट दर कसे, असा सवाल केला. यानतंर वाहकला पोलिस स्टेशनलाच बस घेऊन चला तसेच प्रसारमाध्यांनाही तिकिटाच्या अफरातफरीबाबत माहिती देतो, असा दमच भरला होता. यानंतर वाहकाने चूक मान्य करत २० रुपयांचे तिकीट ठेकेदाराला दिले.
पपया नर्सरी येथून महिरावणीला जाण्यासाठी बसलो. पहिल्या दिवशी २० रुपयांचे तिकीट आकारण्यात आले. दुसऱ्या दिवशी महिरावणीला जाण्यासाठी वाहकाने ३० रुपयांचे तिकीट दिले. याबाबत जाब विचारल्यावर पुन्हा वाहकाने २० रुपयांचे तिकीट दिले.
-प्रवासी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम