काय सांगताय! नवीन मंत्रीमंडळ होणार का स्थापन

0
28

मुंबई प्रतिनिधी राजकीय वर्तुळात वेगवेगळे घडामोडींमुळे अडचणी वाढल्या आहेत. यातच आणखी मोठी बाब समोर आली, महाविकास आघाडी सरकार कचाट्यात सापडले आहे. राजकीय वर्तुळात नव्या सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रमदेखील ठरल्याची चर्चा सुरु आहे.

एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकार हे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या रविवारी किंवा सोमवारी होण्याची शकते. सर्वात आधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यमंत्रिपदासाठी अनिल बाबर, राजेंद्र यड्रावरकर, भरत गोगावले, सदा सरवणकर, चंद्रकांत पाटील यांची नावे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटातून कॅबिनेट मंत्रिमंडळासाठी , दादा भुसे, दिपक केसरकर, संजय राठोड, तानाती सावंत, बच्चू कडू आणि आशिष जैस्वाल यांची नावे सूचवण्यात आली आहेत. या माहितीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप समोर आलेली नाही. याशिवाय भाजपही अद्याप समोर आलेली नाही.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here