नाशिक : सोमवार दिनांक (14 ) रोजी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि महिंद्रा अँन्ड महिंद्रा लि., सातपुर यांचे संयुक्त विद्यमाने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकरिता कॅम्पस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी नाशिक येथील महिंद्रा अँन्ड महिंद्रा लि., सातपुर या नामांकीत कंपनीत ITI ( Welder, Fitter, Diesel Mechanic, Motor Mechanic Vehicles) इ. शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची 150 पदांसाठी कॅम्पसभरतीमधुन मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. उक्त कॅम्पस भरतीचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पध्दती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपुर परिसर, त्र्यंबक रोड, नाशिक या ठिकाणी सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 या वेळेत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी सदर सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता,श्रीमती अनिसा तडवी यांनी केले आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम