Weather Update | अवकाळीचं संकट कधी होणार दूर? हवामान खात्याची पावसासंदर्भात मोठी अपडेट समोर

0
18

Weather Update | राज्यात सगळीकडे दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वच भागांत या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू, तूर आणि इतर भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.

Gold Silver Rate | सोने-चांदी खाताय भाव, असे आहेत आजचे दर..?

ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचे संकट ओढवलेलं आहे. मागील दोन दिवसापासून नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा पुन्हा संकटात सापडलेला आहे. त्यामुळे हे अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असतानाच हवामान खात्याने पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मोठी बातमी | पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने नाशिककरांवरील पाणीपट्टी वाढीचं संकट टळलं!

या भागाला गारपिटीचा इशारा
 मुंबईसह पुणे विभागाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाण्यालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसात अवकाळीने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली. आधीच जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आणि आता अवकाळीची अवकळा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान सहा अंशाने घसरलेले आहे. यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here