Water wastage : एकीकडे पाण्यासाठी आंदोलने दुसरीकडे रस्त्यावर वाहताय पाण्याचे पाट ; धुळे शहरातील विदारक चित्र


Water wastage : 154 कोटी पाणीपुरवठा योजने अंतर्गत नगांवबारी येथे उभारण्यात आलेल्या 2 जलकुंभ मागिल सुमारे साडेचार वर्षापासुन वापर न झाल्याने संपुण जलकुंभास चारही बाजुने मोठया प्रमाणावर तडे गेले आहेत.

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना अंतर्गत धुळे शहरात आणलेल्या पाण्याने सदर जलकुंभ मागिल काही दिवसांपासुन भरण्याचे काम सुरु होते. सदर जलकुंभ पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्या जलकुंभाला सर्वत्र तडे असल्याकारणाने त्यातुन पाणी झिरपण्यास सुरुवात झाली. सदरची बाब म.न.पा. प्रशासनास कळाल्यानंतर तातडीने सदर जलकुंभातुन पुर्ण पाणी लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रं. 3 वर सोडण्यात आले. सदर जलकुंभामध्ये जास्त कालावधीसाठी पाणी ठेवले असता सदर जलकुंभ फुटण्याची दाट संभावना आहे. सदर जलकुंभाना लगतच नगांवबारी परिसरातील दाट वस्ती आहे. सदर वस्तीत कच्चे व पक्के घरे आहेत. अश्या परिस्थितीत सदर जलकुंभ फुटल्यास वित्तहानी होईल. तसेच जिवीत हानी होण्याची दाट शक्यता आहे. याच कारणास्तव म.न.पा. प्रशासनाने सदरचे जलकुंभ पुर्णतः खाली करण्याचा निर्णय घेतला.

154 कोटीच्या पाणीपुरवठा अंतर्गत बांधलेले जलकुंभ हे इस्टीमेट प्रमाणे तयार करण्यात आलेले नाही. सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. सदर कामांमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. सदर जलकुंभाना बांधल्यापासुन काही दिवसातच तडे गेल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे सदर कामांची चैकशी होण्याबाबत यापुर्वीही मागिल अनेक वर्षापासुन देवपुर शिवसेना तसेच शिवसेना महानगर, धुळे मार्फत मोठया प्रमाणावर मागणी केल्यावरही सत्ताधारी भाजप पक्षातील काही पदाधिकारी व नगरसेवक तसेच म.न.पा. प्रशासनातुन काही अधिकारी यांनी ठेकेदाराशी आपसात संगनमत करुन, सदर कामतील भ्रष्टाचार लपविण्याच्या हेतुने आजतागायत कोणतीही कार्यवाही केली नाही.

154 कोटी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले जवळपास सर्वच म्हणजे 13 जलकुंभ अशाच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे निकामी झाल्या आहेत. जवळपास सर्वच जलकुंबांना अशाच पद्धतीचे तडे गेल्याने जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातूनही पाणी गळण्याची दाट शक्यता आहे. 154 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारलेल्या 13 जलकुंभ द्वारेच संपूर्ण धुळे शहरास पाणीपुरवठा होणार होता. तेरा जलकुंभान पैकी अनेक जल कुंभाचे अद्याप टेस्टिंग केलेल्या नाहीत. सर्वच जलकुंबांच्या टेस्टिंग केल्यानंतर जवळपास सर्वच जलकुंभ निकामी अवस्थेत असल्याचे निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. कारण सदर जलकुंभ देखील मागील सुमारे साडेचार वर्षांपासून वापरण्यात आलेले नाही. सदर पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार एकदम बाहेर येऊ नये याच एकमेव कारणास्तव, शिवसेनेच्या अनेक निवेदने व आंदोलनानंतर देखील मनपा प्रशासनाकडून अद्याप इतर जलकुंभां ची टेस्टिंग झालेली नाही. यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे की, संपूर्ण शहरास पाणीपुरवठा करणारे 13 जलकुंभ निकामी असल्याकारणाने पाणीपुरवठा योजनेतून 154 कोटी व अक्कलपाडा योजनेतील 175 कोटी असे संपूर्ण एकूण धुळेकरांचे 329 कोटी हे व्यर्थ गेलेले आहे.

धुळेकरांच्या ‘पाणी’ या महत्त्वपूर्ण समस्येचे निराकरण करण्यास सत्ताधारी भाजप पक्ष व मनपा प्रशासन पूर्णतः यशस्वी ठरलेले आहेत. धुळेकरांचे ‘पाणी’ या विषयावर सत्ताधारी भाजप पक्षाकडून सातत्याने मोठ्या प्रमाणावर राजकारण केले जात आहे. धुळेकरांना दररोज पिण्याचे पाणी यावर 329 कोटी खर्च करूनही मिळणार नाही. केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी धुळेकरांना भाजप सत्ताधारी व मनपा प्रशासनाकडून ‘उल्लू’ बनवले जात आहे.

154 कोटी पाणीपुरवठा योजनेतील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व भ्रष्टाचारामुळे ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करण्यात आले होते. असे असताना देखील सत्ताधारी भाजप पक्षाकडून अक्कलपाडा पाणीपुरवठा योजने चे 175 कोटीचे कामही पुन्हा त्याच ठेकेदारच देण्यात आले. एकंदरीत संपूर्ण 329 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामातील सर्वच भ्रष्टाचार लपवण्यासाठी पुन्हा त्याच त्याच ठेकेदाराला काम दिले जात आहे.

https://thepointnow.in/delhi-murder-breaking/

 154 कोटी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सर्वच जलकुंभां चे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. कारण सर्वच जलकुंभ हे धोकेदायक परिस्थितीमध्ये आहेत. सदर जलकुंभ वापरण्याचा प्रयत्न झाल्यास त्यापासून मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास धुळेकर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर जलकुंबांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येऊन, सदर जलकुंभ हे वापरण्याच्या परिस्थितीत नसतील किंवा रिपेअर करण्याच्या परिस्थितीत नसतील तर सदर सर्व जलकुंभ हे उतरविणे/डीमॉलिश करणे गरजेचे आहे. अशी मागणी आम्ही शिवसेना मार्फत करीत आहोत. असे खुले निवेदन यावेळी ललित माळी विधानसभा संघटक यांनी केले आहे. धुळेकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाशी अस्ववेदनशीलपणे खेळ करणाऱ्यांना शिवसेना स्टाईल मध्ये उत्तर देण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

ललित माळी, विधानसभा संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!