Murder breaking : दिल्लीत महिला असुरक्षित? ; भरदिवसा, भररस्त्यात विद्यार्थिनीची, हत्या


Murder breaking : दिल्लीमध्ये महिला हिंसाचाराच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. आज पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून दक्षिण दिल्लीमधील मालवीय नगर या ठिकाणी एका विद्यार्थिनीवर रॉडने हल्ला करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ही तरुणी दिल्ली विद्यापीठाच्या कमला नेहरू कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. या हल्ल्यानंतर तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला असल्याने रुग्णालय प्रशासनाने तिला मृत घोषित केले.

दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर कॉलेज आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता प्रेम संबंधांमधून तिची हत्या करण्यात आली असल्याचं समोर आले. हत्या (Murder) दरम्यान पोलिसांनी या घटनेचा गांभीर्य लक्षात घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारावर तिचाच चुलत भाऊ असलेल्या इरफान याला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला नेहरू कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आपल्या मित्रासोबत कॉलेजच्या पार्कमध्ये आली होती. यावेळी तिच्यावर इरफान याने लोखंडी रॉड ने हल्ला केला आणि यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलीस (Delhi Police) दरम्यान याप्रकरणी तपास करत असताना मयत तरुणीचं वय हे 22 वर्ष असून तिची हत्या करणाऱ्या इरफान याचं वय 28 वर्षे आहे. हे दोघेही चुलत भाऊ बहीण आहेत.

दरम्यान इरफान याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. यामध्ये इरफान हा बेरोजगार असल्यामुळे मुलीच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नासाठी नकार दिला होता. त्यानंतर मुलीने त्याच्याशी बोलणं बंद केलं. यातून मानसिक दृष्ट्या अस्वस्थ झालेल्या इरफानने आज तिची डोक्यात रॉड घालून हत्या केली आहे. या आधी इरफान हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

https://thepointnow.in/monsoon-update/

दिल्ली महिला आयोग अध्यक्ष स्वाती मालीवाल यांची सडकून टीका

स्वाती मालीवाल यांनी विद्यार्थिनीच्या खून प्रकरणावरून मोठी टीका केली आहे. दिल्लीत गुरुवारी रात्री महिलेची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. आणि आज पुन्हा एका विद्यार्थिनीचा खून करण्यात आला. दिल्ली महिलांसाठी सुरक्षित नसल्याचा हल्लाबोल स्वाती मालीवाल यांनी केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीमध्ये महिला अत्याचार, हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन कठोर पावले उचलावी अशी मागणी केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!