Water reduction | नाशिककरांनो पाणी जपुन वापरा! डिसेंबरमध्येच राज्यात उरला ६४ टक्केच पाणीसाठा

0
19
Water reduction
Water reduction

Water reduction | यंदा महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस झाला नसून याचा दुष्परिणाम आता सामान्य जनतेला भोगावा लागणार आहे. अगदी डिसेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील काही भागात ट्रॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ उद्भवली आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात हि परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. सध्या राज्यात 2994 धरणे असून त्यात 138 मोठी, 260 मध्यम तर लहान आकाराची 2594 धरणांचा समावेश आहे.

राज्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे याचा परिणाम शेतीसह सामान्य जनतेला देखील बसणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील धरणांची 1430 अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी क्षमता असून सर्व धरणांमध्ये सोमवारी सुमारे 64.65 टक्के पाणीसाठा उरलेला आहे म्हणजेच 929 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहीलेला आहे. शिल्लक एकूण पाणी साठ्यापैकी किती टक्के पाणी पिण्यासाठी आणि किती टक्के पाणीसाठा शेतीसाठी वापरायला द्यायचा याचा निर्णय कालवा सल्लागार समितीला जानेवारी ते फेब्रुवारीनंतर घ्यावा लागणार आहे.

Nashik News | १९४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त; रात्री २ पर्यंत कारवाई सुरू

राज्यात यावर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी देत सुट्टी मारली. यातच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या थोड्याफार पावसाने धरणे भरण्यास मदत झाली होती मात्र पावसाअभावी खरीप आणि रब्बी हंगामातील बहुतांश पिके वाया गेली  आणि त्यामुळेच राज्य सरकारने 15 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी म्हणुन जाहीर केले होते.

डिसेंबर महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून एल-निनो वादळाच्या प्रभावामुळे यंदा पावसाने चांगलीच दांडी मारली आणि त्यामुळे राज्यातील धरणेही भरलेली नाहीत दुसरीकडे जूनच्या पावसावर शेतकऱ्यांनी पिकं घेतली होती. अनेक भागात समाधानकारक पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने पुढे जाऊन नाशिक शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.New Mobile | नविन वर्षात फोन घेताय तर ‘या’ फोनवर मिळतोय १७ हजारांचा जबरदस्त डिस्काउंट

Water reduction | नाशिकमधील धरणाची स्थिती काय? (पाणीसाठा टीएमसीमध्ये)

नाशिक ५३७ ६८.५७ ८९.४०


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here