Virat Kohli | आता T-20 आणि वनडे खेळणार नाही; वर्ल्डकपनंतर विराटचा मोठा निर्णय

0
11

Virat Kohli | नुकत्याच झालेल्या Worldcup 2023 मध्ये अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी नाराज झाले. असं असताना विराट कोहली सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरलेला होता. विराट कोहलीने 2023 च्या विश्वचषकात 765 धावांसह सर्वाधिक करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

Crime News | सजून धजून नवरी वरातीची वाट बघत होती; पण नवरा आत्तेबहिणीसोबत फरार

असं असताना आता विश्वचषकानंतर विराट कोहलीने सर्व क्रिकेटप्रेमींना धक्का दिला आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून सुरू होत आहे. पण, त्याआधी मोठी बातमी समोर आलेली आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपनंतर एक मोठा निर्णय घेतलेला आहे. (Virat Kohli)

विराट कोहलीने आपल्या निर्णयाची माहिती बीसीसीआयला दिल्याचे वृत्त समोर आलेले आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर T-20 आणि एकदिवसीय सामने खेळण्यास नकार दिलेला आहे. यामुळेसर्वत्र याची सध्या चर्चा झाली आहे.

कोहली पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती घेईल आणि फक्त कसोटी क्रिकेटसाठी उपस्थित असणार आहे. अशी माहिती समोर आलेली आहे. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या T-20 मालिकेने होणार आहे. यामुळे टीममध्ये काही बदल देखील करण्यात आलेले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here