राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे यांचे १४ ऑगस्ट रोजी मुंबई येथे सरकारने आयोजित केलेल्या मराठा आरक्षण मीटिंगसंदर्भात मुंबईच्या दिशेने जात असतांना-पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रवास करताना पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झालं, आणि सर्व महाराष्ट्र राज्यातील शिवसंग्राम कार्यकर्ते व मराठा समाज बांधव पोरका झाला.
नाशिक जिल्ह्यात २२ ऑगस्ट सोमवार दरम्यान स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या अस्थी कलश इगतपुरी तालुक्यात आणणार असून दरम्यान इगतपुरीत स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या अस्थी कलश यात्रा इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा, धामणगाव, बेलगाव, पिंपळगाव मोर, घोटी, गोंदे , वाडीव-हे येथे येणार असल्याची माहिती शिवसंग्राम जिल्हा कार्याध्यक्ष महेश गाढवे पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत दिलेला लढा आपण कधीच विसरू ,शकणर नाही. तरी इगतपुरी तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व समाज बांधव कार्यकर्त्यांनी अस्थी कलश दर्शनासाठी दिलेल्या ठिकाणी यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा समाज बांधवांकडून रविवारी दुपारी चार वाजता घोटी येथील राजाराम साळवी मंगल कार्यालयात शोकसभा देखील आयोजित केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम