Vijay Karanjkar | आप्पा गद्दार होऊ नका; करंजकरांना नेटकऱ्यांनी घेरले..?

0
50
Vijay Karanjkar

Vijay Karanjkar | नाशिकच्या राजकारणात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. काल मध्यरात्रीच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. यापूर्वी त्यांनी आपला ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. गेल्या दोन टर्मपासून लोकसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही आणि इच्छुक असलेल्या करंजकर यांना यावेळीही डावलल्याने ते संतप्त झाले होते.

गेल्या वर्षभरापासून विजय करंजकर हे लोकसभेची तयारी करत होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे प्रचंड संतापलेल्या विजय करंजकर यांनी पत्रकार परिषद घेत आली नाराजी बोलून दाखवली. आपल्या निष्ठेचे हेच फळ आहे का..?. दोन टर्मपासून आपल्याला सांगितले जातय की तयारी करा. मात्र, आता ऐनवेळी दुसरंच कोणाला तरी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता आपण निवडणूक लढवणार आणि पडणार पण, असा निर्धारच त्यांनी केला होता. (Vijay Karanjkar)

Nashik Loksabha | नाशिक लोकसभेचे दृश्य स्पष्ट होणार; करंजकरांसोबत किती नगरसेवक शिंदे गटात येणार..?

करंजकरांवरील नाराजी सोशल मिडियावर उतरली 

यानंतर ते कधी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारातही सामील झाले नाही. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काल मध्यरात्री अचानक त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. दरम्यान, विजय करंजकर यांच्या एकूण भूमिकेमुळे अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात नाराजी आहे. करंजकर (Vijay Karanjkar) यांच्यावरील ही नाराजी नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर उतरवायला सुरुवात केली.

Vijay Karanjkar | तुमचा वसंत मोरे होईल.. 

विजय करंजकरांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याविरोधात इंस्टाग्रामवर खूप जास्त प्रमाणात निगेटिव्ह कमेंट्स येत असल्यामुळे त्यांना आता अक्षरशः कमेंट सेक्शन बंद करावे लागले आहे. सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच घेरले असून, यावरून त्यांची ही भूमिका लोकांना आवडली नसल्याचे दिसत आहे. “गद्दार नका होऊ आप्पा, तुमचा वसंत मोरे होईल कुठलेच राहणार नाही” अशा अनेक कमेंट्स त्यांच्या पोस्टच्या खाली बघायला मिळत आहेत. (Vijay Karanjkar)

Nashik Loksabha | दादा भुसेंच्या शिष्टाईला यश; करंजकर यांचा शिंदे गटात प्रवेश..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here