VidhanParishad Election | ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर

0
27
VidhanParishad Election
VidhanParishad Election

VidhanParishad Election | महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडली असून, आता सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. दरम्यान, कालच निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार ४ जूनला लोकसभेचा गुलाल उधळल्यानंतर लगेचच विधान परिषदेची तयारी सुरू होणार आहे. २६ जून रोजी विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. (VidhanParishad Election)

यातच आता ठाकरे गटाकडून आपल्या उमेदवारांची नावंही जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेना (ठाकरे गट) मध्यवर्ती कार्यालयातून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब (Anil Parab) यांना ठाकरे गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर, मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ठाकरे गट आघाडीवर असून, आतापासूनच विधानपरिषद निवडणुकीची (VidhanParishad Election) जोरदार तयारीही सुरु झाली आहे.

Vidhanparishad | विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला; असा आहे निवडणूक कार्यक्रम

VidhanParishad Election | उमेदवारांची राजकीय कारकीर्द 

अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी पूर्ण होत आहे. ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि जवळचे समजले जातात. मविआ सरकारच्या काळात ते परिवहन मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अशी पदं त्यांनी भूषविली आहेत. अनिल परब हे २०१२ आणि २०१८ मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले असून, आता त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.(VidhanParishad Election)

तर, दुसरे उमेदवार ज. मो. अभ्यंकर हे ठाकरे गटाच्या शिक्षक सेनेच्या प्रांताध्यक्ष पदी कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात आणि शिक्षकांच्या समस्यांवर त्यांनी कामे केली आहेत. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ही पदं त्यांनी भूषविली आहेत. (VidhanParishad Election)

Maharashtra MLC Election | शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुका स्थगित; कधी होणार निवडणूक..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here