Vidhan Parishad Election | मुंबई : लोकसभेनंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीची धूम सुरू असून, राज्यातील ४ जागांवर ही निवडणूक पार पडणार आहे. यात कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघ यांचा समावेश आहे. मात्र, नाशिक लोकसभा निवडणुकीदरम्यान जसा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. तो आता याही निवडणुकीत होताना दिसत आहे. तर, नाशिकच्या जागेवर महायुतीत शिंदे गटांसह अजित पवार गटानेही उमेदवार दिला असून, दुसरीकडे कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघांमध्ये मविआमधील (Maha Vikas Aghadi) चढाओढ काहीशी शमली आहे. (Vidhan Parishad Election)
कोकण पदवीधर मतदार संघातून ठाकरे गटाचे किशोर जैन आणि नाशिकमधून काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. दिल्लीतून आदेश आल्यानंतर ही तडजोड झाल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यामुळे कोकणमधून ठाकरे गटाने तर नाशिकमधून काँग्रेसने माघार घेतली. (Vidhan Parishad Election)
Vidhan Parishad Election | नाशिकमधून विधानपरिषदेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल
मात्र, राज ठाकरेंची समजूत घातल्यानंतर मनसेने माघार घेतली. त्यामुळे आता भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर असा सामना कोकण पदवीधर मतदार संघात होणार आहे. तर, मुंबई शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे प्रकाश सोनवणे यांना नाना पटोलेंनी फोन करत अर्ज मागे घेण्यास सांगितले असून, येथे भाजपचे शिवनाथ दराडे, ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे अशी तिरंगी लढत रंगणार आहे. तर, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी देखील माघार घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.(Vidhan Parishad Election)
Vidhan Parishad Election | असा आहे निवडणूक कार्यक्रम
महाराष्ट्र विधान परिषदेतील चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपणार असल्याने मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार असून, १ जुलै रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. (Vidhan Parishad Election)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम