Vidhan Parishad Election | नाशिकमधून विधानपरिषदेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल

0
44
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election |  लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान उद्या पार पडणार असून, लोकसभेचा गुलाल येत्या ४ जून रोजी उधळला जाणार आहे. तर, यानंतर राज्यात धूम असणार आहे ती विधान परिषद निवणुकीची. विधानपरिषदेच्या चार आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने या चार जागांवर येत्या २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (Vidhan Parishad Election)

या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली असून, आजपासून अर्जाचे अर्ज विक्री आणि स्वीकृती होणार आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी नाशिक शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीसाठी भाजपचे अहमदनगर येथील युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विवेक कोल्हे म्हणाले की, “मी कुठलीही बंडखोरी केली नाही. कारण ज्या मतदारसंघाची ही निवडणूक आहे तो मतदार संघ हा शिक्षकांशी निगडित मतदारसंघ असून, येथे राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण या उमेदवारीकडे बघायला हवे. तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. तर, शिक्षक हा देश घडवणारा महत्त्वाचा घटक असल्याचेही यावेळी कोल्हे म्हणाले. (Vidhan Parishad Election)

Vidhan Parishad Election | नाशिकमधील ठाकरे गटाचा ‘हा’ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात..?

Vidhan Parishad Election | पक्ष विरहित उमेदवारी करण्याचा शिक्षकांचा आग्रह 

आयवेळी बोलताना पुढे विवेक कोल्हे म्हणाले की, “या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे ठरवले आहे. आपण पक्ष विरहित उमेदवारी करावी, असा येथील शिक्षकांचा आग्रह असल्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला आहे. निवडणूक प्रक्रियेचा हा भाग असून, जी ती गोष्ट ज्या त्या वेळेत व्हायला हवी. इतर कामाला लागण्यासाठी मी आज पहिले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कारण निवडणूक जाहीर झाल्यावर एक-एक मत आणि एक-एक व्यक्ती ही महत्त्वाचा असतो. तर, ज्यावेळी अपक्ष उमेदवारी केली जाते. त्यावेळी कुठल्याही पक्षाकडे पाठिंबा मागण्याचा प्रश्न हा उद्भवत नाही, असेही ते म्हणाले. तर, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यादेखील याठिकाणी उपस्थित होत्या.

Vidhan Parishad Election | मनसेकडून उमेदवार जाहीर; पण उमेदवारी मनसेची की, महायुतीची..? 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here