Vidhan Parishad Election | लोकसभेचा गुलाल उधळल्यानंतर लगेचच राज्यातील चार जागांवर विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडणार आहे. यासाठी २६ जून रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. नुकतंच दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाने आपल्या दोन जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली. यात अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Vidhan Parishad Election)
यानंतर आता मनसेनेही आपला एक उमेदवार जाहीर केला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) कोकण पदवीधर मतदार संघातून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत पक्षाने उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.
या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशावरुन, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.”
VidhanParishad Election | ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर
उमेदवारी मनसेची की, महायुतीची?
दरम्यान, मनसेने कोकण पदवीधरमधून अभिजीत पानसेंना उमेदवारी दिली. मात्र, ही पानसेंची उमेदवारी नेमकी मनसेची म्हणायची की महायुतीची? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. कोकण पदवीधर मतदार संघाची जागा ही भाजपकडे असून, सध्या डावखरे हे येथे आमदार आहेत.(Vidhan Parishad Election)
तर, ४ आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने विधान परिषदेच्या ४ जागांवर निवडणूक होत आहे. मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असून, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही राज ठाकरेंनी आणि मनसेने महायुतीचा प्रचार केला. दरम्यान, आता महायुती मानसेला पाठिंबा देणार..? ही उमेदवारी मनसेची की महायुतीची? हा सवाल कायम आहे.
Vidhanparishad Election | ठाकरे गटाकडून ‘हे’ उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात..?
Vidhan Parishad Election | कोण आहेत मनसेचे उमेदवार..?
मनसेने कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेचे नेते अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली असून, ते एक प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. २०१४ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या रेगे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित “ठाकरे” या चित्रपटाची निर्मिती केली होती. हादेखील चित्रपट अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केला होता.(Vidhan Parishad Election)
ठाकरे हा सिनेमा महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रचंड गाजला होता. शिवसेनेत असताना भारतीय विद्यर्थी सेनेसाठी त्यांनी ममोठी कामगिरी केली. मात्र, आदित्य ठाकरेंच्या राजकारणातील एंट्रीदरम्यान, युवासेना स्थापन करण्यात आली आणि शिवसेनेची विद्यार्थी सेना युवासेनेत विलीन झाली. त्यामुळे नाराज पानसे मनसेत दाखल झाले.
अभिजित पानसे हे चित्रपट क्षेत्रासह राजकारणातही सक्रिय असून, मनसेच्या चित्रपट सेनेची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय असून, अभिजीत पानसे यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूकदेखील लढवली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम