Beed Cast politics | वंजारी समाजाने मराठा व्यक्तींकडून खरेदी केल्यास दंड; जातीय वादाला खतपाणी कोण घालतंय..?

0
50
Beed Cast politics
Beed Cast politics

बीड :  राज्यात लोकसभेच्या पाचही टप्प्यांचे मतदान झाले असून, आता सर्वांना उत्सुकता आहे ती केवळ ४ जूनची. ४ जून रोजी मतमोजणी होणार असून, त्यापूर्वी मात्र राज्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळताय. नगर, बारामती, बीड येथे इव्हीएम ठेवलेल्या कक्षांवरून अनेक आरोप शरद पवार गटाकडून (sharad pawar) केले जात आहेत. तर, बीडमध्ये बूथ कॅप्चर झाल्याचे आरोप करत फेरमतदान घेण्याची मागणीही शरद पवार गटाने केली आहे.(Beed Cast politics)

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीला बीडमध्ये जातीय रंग आल्याचे पाहायला मिळाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे (manoj jarange) हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहे. त्यामुळे मराठा आंदोलन पेटलेले असतानाही त्याची धग बीडमध्ये सर्वाधिक बसली होती. त्यातच, बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे (pankaja munde) विरुद्ध महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे (bajrang sonawane) हे मैदानात आहे. मात्र, यावेळी येथे अनेक ठिकाणी मराठा-वंजारी वाद स्थानिक पातळीवर उफाळून आल्याचे दिसून आले. प्रचारादरम्यान अनेक गावांत पंकजा मुंडेंना मराठा समाजाचा विरोध होतानाही दिसून आला.

Manoj Jarange | तुला तंगडीसकट बाहेर ओढतो; ४ जूनला मराठ्यांनी अंतरवालीला या

एकमेकांच्या दुकानातून वस्तु खरेदी केल्यास दंड

दरम्यान, हा मराठा-वंजारी वाद बीडमध्ये पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसत आहे. कारण, मराठा-वंजारी समाजात एकमेकांच्या दुकानातून वस्तु खरेदी केल्यास दंड आकारण्यात येईल, असे बजावणारे काही कथित व्हिडिओ सोशल मिडियावरून समोर येत आहे. त्यानंतर, आता बीडचे पोलीस अधीक्षक मुंडेंवाडीत पोहोचले आहेत.

Beed Cast politics | गावकरी अचानक इतके संतप्त का झाले..?

बीड लोकसभा निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण झाल्याचे चित्र स्पष्ट असून, या राजकीय वादांचे परिणाम आता स्थानिक पातळीवर पडत असल्याचे दिसत आहे. तर, येथील दोन गावांमधील वंजारी समाजाच्या नागरिकांनी थेट मराठा समाजाच्या व्यक्तींकडून काहीही खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या एकूण प्रकारामुळे बीड लोकसभेतील जातीय संघर्ष आता टोकाला गेला असून, हे गावकरी अचानक इतके संतप्त का झाले..? या वादाला खतपाणी कोण घालतंय..? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या जातीय वादाचे परिणाम बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील मुंडेवाडी गावात वंजारी समाजाच्या नागरिकांनी मराठा समाजाच्या व्यक्तीकडून कुठल्याही वस्तूंची खरेदी करू नये, असा निर्णय घेतल्याची माहिती समाजमध्यमांद्वारे समोर आल्यानंतर पोलीस प्रशासन जागे झाले आणि बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे या वादग्रस्त मुंडेवाडीत पोहोचले आहेत.

Manoj Jarange | मला हलक्यात घेऊ नका..; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here