Nashik news | नाशिक शहरात गुन्हेगारी सत्र थांबता थांबेना शुल्लक कारणांवरून मोठमोठे गुन्हे घडत आहेत. दरम्यान, अशाच एका शुल्लक कारणांवरून नाशिकच्या काठेगल्लीत दोघांकडून चारचाकी, रिक्षा व दुचाकी अशा सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. या सात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी, भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दोघांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, संशयित सुमित पगारे (रा. धम्मनगर, कथडा) याने तरुणीशी ओळख वाढवून संबंध प्रस्थापित करून विवाह करण्याची मागणी केली होती दरम्यान तरुणीने त्याला नकार दिला.
यावरून, संशयिताने मनात राग धरून मंगळवार (दि .१४) संशयिताने त्याचा सहकारी विकी जावरे (रा.काठेगल्ली, नाशिक) याच्या मदतीने तरुणीच्या दुचाकीसह अन्य ५ दुचाकी, १ चारचाकी आणि एक रिक्षाची जाळपोळ करून नुकसान केले आहे.
OBC एल्गार मेळाव्यासाठी सिन्नरमध्ये कार्यकर्ते सज्ज; मोठया नेत्यांची असणार उपस्थिती
सर्वप्रथम संशयीतांनी मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान तरुणीचा भाऊ त्यांच्या अपार्टमेंटच्या बाहेर बसला असताना त्याला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा रात्री साडेतीन वाजता पुन्हा त्याचठिकाणी येऊन वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून वाहनांची जाळपोळ केली. दरम्यान, आरडाओरड झाल्याने अपार्टमेंटच्या खाली येऊन पाहिले असता वाहने जळत असल्याचे आढळून आले.
स्थानिक रहिवाशांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत बहुतांशी प्रमाणात वाहने जळून खाक झाली होती. यापूर्वीही संशयित पगारे याने तरुणीच्या दुचाकीची तोडफोड केली. या घटनेनंतर अपार्टमेंटच्या पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, त्यात दोघे संशयित आढळून आले.
Big News | माधुरी दीक्षित यांना खासदारकीचं तिकीट? भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं केलं स्पष्ट
दरम्यान, याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भद्रकाली गुन्हे शोध पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासांतच दोघा संशयीतांना ताब्यात घेतले.
या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सणासुदीत अशी घटना घडल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. संशयीतांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी आता आता पोलीस अधिक तपास करित आहेत.
crime news | गिरणा नदीपुलावर चार वाहनांचा विचित्र अपघात
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम