नाशिक – वणीची सप्तश्रृंगी माता आज मूळ स्वरूपात अवतरल्या आहेत. देवीच्या मूर्तीतून तब्बल ११०० किलो शेंदूर काढल्यानंतर वणीतील सप्तश्रृंगी देवी मूळ स्वरूपात समोर आल्या आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील देवीला मूळ स्वरूप देण्यासाठी व मूर्तीच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर गेल्या २१ जुनपासून दर्शनासाठी बंद होते. पुरातत्व विभागाच्या सहकार्याने देवीच्या मूर्तीतून तब्बल ११०० किलोचे शेंदुर काढण्यात आले आणि देवीला मूळ स्वरूप देण्यात आले. हा शेंदूर दोन फुटांच्या वर काढण्यात आला असून तो तब्बल १००० वर्ष जुना होता.
मंदिराचे पुजारी व ट्रस्टच्या विश्वस्तांचा उपस्थितीत देवीचा दर्शन सोहळा पार पडला. नवरात्रीच्या पहिल्या माळेला सप्तश्रृंगीगड भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे, असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम