Crime : सिडकोत पुन्हा कारच्या काचा फोडण्याचा प्रकार घडला आहे. सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच हेडगेवर चौकात मंगळवारी मध्यरात्री पार्किग केलेल्या १६ कारच्या काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी अर्ध्या तासात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच हेडगेवार चौकात मंगळवारी रात्री १ ते २ च्या दरम्यान हा प्रकार घडला. अज्ञात समाज कंटकांनी घरासमोर तसेच मैदानात पार्किंग केलेल्या कारच्या काचा फोडल्याने मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांमध्ये या प्रकारामुळे घबराट पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले सहकारी समवेत घटना स्थळी दाखल झाले. घटनेचा तपास करून अवघ्या दोन तासात त्यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस यासंदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम