Savargaon : आज गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमेनिमित्ताने प्रत्येक जण आपल्या शैक्षणिक, अध्यात्मिक आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये गुरुपद भूषवलेल्या प्रत्येक अप्रतिम कृतज्ञता व्यक्त करत असतो. अशीच अनोख्या पद्धतीने मालेगाव येथील वैष्णवी वाघ हिने श्री स्वामी समर्थ आपली कृतज्ञता एका रांगोळीच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
गुरूपौर्णिमेनिमित्त सलग २४ तास रांगोळी रेखाटून श्री स्वामी समर्थांची प्रतिमा वैष्णवी वाघ हिने साकारली आहे साकारली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सावरगाव येथील पुरातन मंदिरात आज गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. याच निमित्ताने मालेगाव येथील वैष्णवी वाघ या बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने तब्बल २४ तास वेळ देऊन अगदी चित्राप्रमाणे हुबेहूब श्री स्वामी समर्थांची रांगोळी काढली आहे. ही रांगोळी येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. तर दिवसभर रांगोळीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी देखील केली होती.
वैष्णवी हिने शनिवारी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत तर पुन्हा रविवारी सकाळी ९ ते रात्री १० पर्यत ही मुलगी सदरची रांगोळी काढत होती. मालेगाव येथील स्वामी भक्त विजय वाघ यांची कन्या वैष्णवी आहे. ती सध्या मालेगाव येथील काकाणी विद्यालयात १२ वी शिकते शिकत आहेत.तीने यापूर्वी मालेगाव साई आर्ट प्रदर्शनात हुबेहूब शेतकरी रांगोळीतुन काढला होता. वडील विजय वाघ मागील ३०-३२ वर्षापासून सावरगाव येथील स्वामी समर्थांची भक्ती करतात.त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी वैष्णवी नियमितपणे येथे दर्शनाला येते.वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही रांगोळी काढल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.आज पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार, दत्तूभाऊ पवार,श्री.भुरुक तसेच सावरगाव विद्यालयाचे प्राचार्य मारोती अलगट,जेष्ठ शिक्षक गजानन नागरे,वसंत विंचू आदींनी या रांगोळीचे कौतुक केल आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम