Trambkeshwar : सपकाळ नॉलेज हब च्या प्राध्यापकाकडून अज्ञातांनी मागितली पंचवीस लाख रुपयांची खंडणी

0
21

Trambkeshwar : नाशिक मधील सुप्रसिद्ध सपकाळ नॉलेज हब मध्ये शिकवणाऱ्या एका प्राध्यापकाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवत जिवंत सोडण्याच्या बदल्यात पंचवीस लाखांची खंडणी मागण्यात आल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे.

हरीशकुमार क्रिष्णन पद्मनाभन वय 38 राहणार म्हसरुळ नाशिक हे सपकाळ नॉलेज या त्रंबकेश्वर जवळील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 12 जूनला दुपारच्या सुरमारास कॉलेजमध्ये असताना त्यांना काही अज्ञात इसमांनी फोन केला.

यावेळी उपर से तुम्हारे नाम की सुपारी आयी है। तुम मुझे पचास हजार रुपये दो दिन मे करके दो। मे उपर से बोल के तुम्हारा मॅटर सॉल्व कर दुंगा, तेरी अम्मी घर पर अकेली है। तुम पैसे नही देगा तो तेरी अम्मी शाम को घर मे नही रहेगी। अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीने घाबरून पद्मनाभन यांनी 15 जूनला द्वारका परिसरातील साई अमृततुल्य हॉटेल परिसरात दोघा जणांना 50 हजार रुपये दिले.

दरम्यान पुन्हा ते पैसे परत करण्याच्या बहाण्याने हरीश कुमार यांना अज्ञातांनी 23 जूनला सायंकाळी जेलरोड येथील सैलानी बाबा या ठिकाणी बोलवून त्यांचे अपहरण केले व त्यांना डांबून ठेवत त्यांच्या ऑनलाईन फोन पे अकाऊंट द्वारे 14 हजार 790 रुपयांचं बिल पेड करून त्यांना सोडून दिले.

यावेळी मात्र जिवंत सोडण्याच्या बदल्यामध्ये हरीश कुमार यांच्याकडून आरोपींनी पुन्हा एकदा 25 लाख रुपयांची मागणी केली अखेर या त्रासाला कंटाळून पद्मनाभन यांनी पोलीस ठाणे गाठत पोलिसांना हा प्रकार सांगितला आहे. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here