Union Bank FD Scam | मनमाड युनियन बँक घोटाळाप्रकरणी आमदार कांदे ॲक्शन मोडवर; घेतला मोठा निर्णय

0
17
Union Bank FD Scam
Union Bank FD Scam

नाशिक :  नाशिकच्या मनमाडमध्ये काही दिवसांपूर्वी युनियन बँक शाखेत अपहार झाल्याप्रकरणी आता नांदगावचे आमदार सुहास कांदे हे ॲक्शन मोडवर आले आहेत. युनियन बँकेच्या मनमाड शाखेत मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा विमा प्रतिनिधीने परस्पर अपहार केल्याची घटना उघडकीस आली असून, यात कोटींचा अपहार झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आता मनमाड (Manmad) येथील युनियन बँक शाखेत एफडी घोटाळ्याप्रकरणी (Union Bank FD Scam) आता नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी हा घोटाळा करणाऱ्या संशयित आरोपी संदीप देशमुख (Sandip Deshmukh) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणातून जबाबदारी झटकणाऱ्या युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात देखील स्वतः आमदार सुहास कांदे यांनी ठेवीदारांसोबत फिर्यादी होवून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संशयित आरोपी संदीप देशमुख यासह सर्व अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जावी, अशी मागणीही आमदार कांदे यांनी यावेळी केली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या सर्व ठेवीदारांनी आमदार कांदे यांची भेट घेतली होती आणि या प्रकरणात त्यांना साद घातली होती. त्यानुसार कांदे यांनी या युनियन बँकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.(Union Bank FD Scam)

Nashik | मनमाड रेल्वे स्टेशन महामार्गावरील ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला

Union Bank FD Scam | अन्यथा आंदोलन 

तसेच पुढील आठ दिवसात हर या प्रकरणी बँक प्रशासनाकडून योग्य निर्णय घेण्यात आला नाही. तर, फसवणूक झालेले ग्राहक आणि शहरातील शिवसैनिकांसमवेत (Shiv Sena) स्वतः युनियन बँकेच्या नाशिक येथील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन (Agitation) करण्याचा इशाराही आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल ७० गुंतवणूकदारांकडून मनमाड पोलिसात (Manmad Police Station) तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मनमाड-येवला मार्गावरील दोन अपघातांत नाशिकचे 5 तरुण; तर पुण्याचा एक जण ठार

नेमकं प्रकरण काय..?

युनियन बँकेच्या मनमाड येथील शाखेतील सुभाष देशमुख या विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार केलेचा प्रकार समोर आला आहे. सुभाष देशमुख या विमा प्रतिनिधीने अनेक मुदत ठेवीदारांकडून बँकेच्या मुदत ठेवी करण्यासाठी आणि त्यांच्या नूतनीकरण करण्यासाठी बेअरर चेक घेतले आणि त्यानंतर ते चेक स्वतःच्या नावावर परस्पर वटवून बँकेत करोडो रुपयांचा अपहार केला. सुरुवातीला हा घोटाळा केवळ १ कोटी ३९ लाख ६५ हजारांचा असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र आता दिवसेंदिवस या घोटाळ्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे. तर, आता या घोटाळ्याचा आकडा हा ५ कोटींच्या वर गेला आहे. (Union Bank FD Scam)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here