Umrane news : तालुक्यातील उमराणे येथील माळी बाबा नगर परिसरात राहणाऱ्या बबीता पोपट माळी यांच्या घरात गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आग लागून एका बारा वर्षाच्या मुलीसह वृद्ध महिला भाजून जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि २४)रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या सुमाराला घडली. जखमींवर उमराणे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सपना पोपट माळी व जिजाबाई महादू माळी अशी जखमींची नावे आहेत. (Umrane news)
Malegaon Politics: जनतेच्या हृदयातील योद्ध्याला हरविण्यासाठी पाच जिल्ह्यातील गर्दी कशासाठी ?
या परिसरात राहणारे सुनील माळी हे मोलमजुरी करतात. गॅस सिलेंडर च्या रेग्युलेटरमधून अचानक आग भडकली. आगीने रौद्ररूप धारण करून घरकुल बांधकामासाठी घेतलेले बचत गटाचे 40 हजार रुपये व घरकुलाचा पुढील हप्ता 40000 अशी 80 हजार रुपये रोकड या आगीत जळून खाक झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी वस्तूं सह आधार कार्ड ,बँक पासबुक ,सेशन कार्ड आधी महत्त्वाची कागदपत्रे आगीच्या भक्षस्थानी सापडली. आजूबाजूला राहणार्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेजारील तरुणाने गॅस सिलेंडरवर ओली गोधडी टाकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर भारत पेट्रोलियमचे वितरक, तलाठी गणेश जाधव ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण अहिरराव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली . या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून ,तात्काळ नुकसान भरपाई मिळावी ,अशी मागणी माळी कुटुंबाने केली आहे.
तानाजी महादू माळी व विधवा बबीता पोपट माळी हे शेतीकाम व मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा चलिथार्थ चालवतात . त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्यामुळे घरकुलाचा तिसरा हप्ता 40000 हजार व बांधकामासाठी बचत गटाकडून घेतलेले अर्थसहाय्य चाळीस हजार असे एकूण 80 हजार रुपये आगीत जळून खाक झाल्यामुळे व डोळ्यासमोर सर्व संसार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.लवकर शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम