Uddhav Thackeray | शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या सिल्लोड येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका करत “अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान केला होता. आता याच आमदाराच्या प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सिल्लोडमध्ये आले होते. हे तुमचे हिंदुत्व? हीच का तुमची संस्कृती? असा सवाल करत टोला लगावला.
उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांवर निशाणा
“आमदार अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान केला होता. याची आठवण करून देत, उद्धव ठाकरे यांनी, “महिलांचा अपमान करणाऱ्या आमदाराच्या प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. हेच का यांचे हिंदुत्व? हीच का यांची संस्कृती? लोकसभेवेळी कर्नाटकात प्रज्वल रेवन्ना याचा प्रचार केला. प्रज्वल रेवन्ना कोण आहे. हे सर्वांनाच माहित आहे. याचे हात बळकट करा, असे म्हणणारे पंतप्रधान यांचे हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी जनतेला विचारला.
सोयाबीनला हमीभाव देण्याचे आश्वासन
त्याचबरोबर त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत, “शेतीमालाला हमीभाव नाही पण गद्दारांना भाव मिळत आहे. यातून गद्दार मस्तीत आहेत. गद्दारांना 50 खोके मिळत असतील तर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे का मिळू नयेत. निवडून दिला तो गद्दार झाला. ज्याने निवडून दिला तो त्यांच्याकडे गेल्यानंतर दादागिरी करतो. मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवले. सोयाबीनला, कापसाला भाव मिळत नाहीत, परंतु मिंध्यांना भाव मिळतोय. मी सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव देणार असे सांगितले.
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगरच्या भाषणाने वेधलं लक्ष; नेमकं प्रकरण काय?
महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारणार
तसेच दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची आठवण करून देत, “यांनी गद्दारी करूय सरकार पाडले नसते तर पुन्हा कर्जमाफी दिली असती. मी म्हणजे मिंधे नाही. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण म्हणून दीड हजार रुपये देत आहेत. हे पैसे मिंधेंनी वडिलांच्या घरातून आणले नाहीत, हे माझ्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत. या माझ्या बहीणींना मी तीन हजार रुपये देणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात स्वतंत्र पोलीस ठाणे बांधणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम