Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगरच्या भाषणाने वेधलं लक्ष; नेमकं प्रकरण काय?

0
46
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धुमाळी सुरू असताना सर्वच राजकीय पक्ष मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगरमधील पैठण येथील सभेत झालेल्या भाषणाने आता लक्ष वेधून घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजी नगर मतदार संघातून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे संदिपान भुमरे निवडून आले होते. तेव्हा आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत असताना उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू, शिवप्रेमी आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो..” असा उल्लेख केल्यामुळे उद्धव ठाकरे विधानसभेसाठी पुन्हा एकदा मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा प्रश्न उपस्थित झाल आहे.

Uddhav Thackeray | निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर? जुन्या पेन्शन योजनेबाबत उद्धव ठाकरेंच मोठं वक्तव्य

लोकसभेमध्ये हिंदू शब्द टाळताना दिसले

आत्ताच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मिळून महाविकास आघाडीतून लढली. तेव्हा प्रचारावेळी भाषणात उद्धव ठाकरे हे जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो असा उल्लेख टाळताना पाहायला मिळाले. ते प्रामुख्याने हिंदू ऐवजी देशभक्त बांधवांनो असा उल्लेख करत होते. 10 मे रोजी संभाजीनगरमध्ये भाषण करताना उद्धव ठाकरे हिंदू शब्द टाळताना दिसत होते. ही लढाई देशाची आहे म्हणून देशभक्त असा उल्लेख करतोय. असे त्यांनी नंतर स्पष्टीकरण देखील दिले होते. मात्र लोकसभेत झालेल्या पराभवानंतर आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्याला न्यायालयाने फटकारले; ठोठावला 2 लाखांचा दंड!

संभाजीनगरच्या पैठणमध्ये उद्धव ठाकरेंची 15 सप्टेंबर रोजी सभा झाली. त्या सभेमध्ये भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरेंनी “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू, महाराष्ट्रप्रेमी, शिवप्रेमी बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो…” असा उल्लेख केला. तेव्हा लोकसभेमध्ये देशभक्त उल्लेख करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदू मनांना भगवी साद दिली आहे का? असा प्रश्न इथे उपस्थित होतोय.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here