द पॉईंट नाऊ ब्युरो : दिवसेंदिवस अपघाताच्या अनेक घटना ऐकायला येत आहेत. मुंबई-पुणे बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले.
दुचाकीस्वार सलील, त्याचा भाऊ वारीस आणि अरबाज रात्रीच्या वेळी बारा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून बाह्यवळण मार्गावरून जात असताना हा अपघातात घडला आहे. बाह्यवळण मार्गावर भरधाव वेगात असलेली दुचाकी ट्रकवर पाठीमागून जोराने आदळली. सलील महंमद जलीस सौदागर वय २२ वर्ष असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
तर अपघातात सलीलचा भाऊ वारीस महंमद समशाद सौदागर, अरबाज महंमद सौदागर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इस्पितळात दाखल करण्याआधीच सलीलचा मृत्यू झाला. सहायक फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम