बनावट जमिनीचा मालक उभा करून व बोगस कागदपत्रे सादर करून, खोट्या सह्या करत मुळ मालकाला कानकुस न लागु देता परस्पर शेत जमिनीचा ८४ लाखाला व्यवहार करूण देणार्या बंटी आणी बबली च्या मुसक्या आवळणयात सटाणा पोलीसांना यश आले आहे अजूनही दोन संशयित आरोपी फरार झाले आहे त्यांचा कसुन शोध सटाणा पोलीस करीत आहेत.
या बाबत सटाणा पोलीसांकडून समजलेली हकिकत अशी कि, बागलाण तालुक्यातील क-हे गावातील प्रतिभा अशोक धिवरे यांच्या मालकीची शेतजमीन आहे. संशयीत आरोपी कमलेश प्रकाश सोनार व त्याची महिला सहकारी प्रतिभा मधूकर आहिरे यांनी त्यांचा तिसरा सहकारी कपिल तुकाराम पिंपळे यांच्या मदतीने बागलाण तालुक्यातील चौगाव येथिल शेतकरी दिपक मोठाभाऊ शेवाळे यांना आमच्या मालकीची क-हे शिवारातील गट क्रमांक ६७/१ हि शेतजमीन विकायची आहे असे सांगितले व जमिनीचे सर्व बनावट कागदपत्रे दाखवले आसता दिपक शेवाळे यांनी सदरची जागा प्रत्यक्ष जाऊन बघीतली व ८४ लाखात सदरचा व्यवहार पक्का केला. खरेदी च्या वेळी शेतजमिनीचे मुळ मालकीन प्रतिभा धिवरे यांच्या नावाचे बनावट पँन कार्ड, आधार कार्ड, तसेच युनियन बँकेचा बनावट निल दाखला प्रतिभा आहिरे व कमलेश सोनार यांनी हुशारीने बनावट बनवून घेतले व स्वता प्रतिभा आहिरे या स्वता शेतजमिनीची मुळ मालकीन असल्याचे भासवून स्वताचा दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीसाठी उभे राहिले. या संपुर्ण व्यवहारात ज्याने शेतजमीन खरेदी केली त्याला थोडीफार सुध्दा कल्पना येवू दिली नाही की त्याची मोठी फसवणुक होत आहे आणी त्याला उत्तम रित्या पद्धतशीर पणे पैसे घेऊन गंडवले गेले आहोत. अखेर कुठेतरी वाचा फुटतेच त्याच प्रमाणे खरेदीदार दिपक शेवाळे हे सात बारा उतारावर नाव नोंदणीसाठी संबधीत तलाठी कार्यालयात गेले असता संबधीत तलाठी यांनी युनियन बँकेला फोन करून निल दाखल्याची चौकशी केली असता तेव्हा बँकेने सदरचा निल दाखला आमचा नसुन बनावट असल्याचे सांगितले तेव्हा दिपक शेवाळे यांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर दिपक शेवाळे यांना आपल्याला फसवले गेले आहे हे लक्षात येताच त्यांनी तडक सटाणा पोलीस स्टेशन गाठले व रितसर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी तपासाचे चक्र फिरवून मालेगाव येथून एजंट कपिल सोनार यास नाट्यमय रित्या अटक करून सटाणा येथे आणले असता त्याने कन्नड येथिल प्रतिभा आहिरे व कमलेश सोनार हे मुख्य गुन्हेगार व आरोपी असुन त्यांनीच सर्व घडवून आणले आहे असा जवाब नोंदवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता दोन्ही आरोपी अनुक्रमे कन्नड आणी संगमनेर येथून सापळा रचून अटक केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उप अधिक्षक पुष्कराज सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील हे पुढील तपास करीत आहेत. या कारवाईत पोलीस हवालदार जिभाऊ पवार, निवृत्ती भोये, रवि शिंदे, रवि शिंदे, अजय महाजन, गोपनीय शाखेचे अशोक चौरे, हरि शिंदे, सागर बेनुसकर, राहुल शिरसाठ, सविता कावळे यांनी सहभाग घेतला
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम