Nashik : मोबाइल हिसकावून नेत ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची चोरट्यांनी लढवताय नवी शक्कल

0
38

Nashik : मोबाईल स्नॅचिंग करून फोन पे, गुगल पे द्वारे पैसे लांबवणाऱ्या दोघा भामट्या चोरांना नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासांमध्ये ताब्यात घेतल आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या गोविंद नगर परिसरात असलेल्या मनोहर गार्डन या ठिकाणाहून पहाटेच्या सुमारास जात असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोघाजणांनी मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत फोन पे ॲप वरून बारा हजार सातशे रुपये रक्कम लांबवली असल्याचं सांगत लक्ष्मण दावड या गोविंद नगर येथील रहिवाशांने मुंबई नाका पोलिसात फिर्याद दिली होती. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला व या वाढत्या प्रकारांची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शोध पथकाला याचा तपास करण्याचे निर्देश दिले.

यानुसार मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील हे या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपींनी तक्रारदारांच्या मोबाईलवरून आपल्या मोबाईल क्रमांकावर पैसे ट्रान्सफर केले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या आधारावर पोलिसांनी बजरंगवाडी परिसरामध्ये सापळा रचून आदर्श सदाशिव निंबाळकर आणि नवाज हसन खान या दोघांनाही ताब्यात घेतल आहे.

 

अवघ्या दोन तासात पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे. दरम्यान त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता देशील पोलिसांनी वर्तवली असून या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here