कोरोनामुळे पालकांसमोरील वाढलेल्या अडचणी, वयात आलेल्या मुलीची चिंता, यातून राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कोविड काळात राज्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह झाल्याचे प्रकार आढळले आहे. महिला व बालविकास विभागाने अकराशे बालविवाह रोखले आहे.याची महिती व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना मंत्री ठाकूर यांनी सांगितले, की महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गाव पातळीवरही बालविवाह व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करणं केले गेले. कायदा बघीतला तर , मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ वर्षे झाल्याशिवाय विवाह करणे गुन्हा आहे. कायद्याने बंद झालेली बालविवाहाची प्रथा पुन्हा सुरू झालेली दिसत आहे.
चाईल्ड लाईनवरुन मिळालेल्या माहिती किंवा तक्रारीवरून बालसंरक्षण समिती व पोलिस अधिकारी बालविवाह रोखतात. राज्यात भीक मागणाऱ्यांमध्ये बालकांचे प्रमाण जास्त आढळून येत आहे. ही गंभीर बाब असून बालकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केले जातात. मुलीच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराची जबाबदारी दिली जाते. पुढील आयुष्यात संघर्षा शिवाय काही पर्याय नसतो. बालविवाहामुळे शाळांमधील मुलींच्या शिक्षणाचा टक्के कमी होत आहे.
गावोगावी अशिक्षित आणि कमी जातीच्या लोकांना शालेय शिक्षण विभाग, बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हेतून बालविवाहाची माहिती समोर येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, नगर, पुणे, यवतमाळ, सांगली, कोल्हापूर, बीड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम