नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये बस उलटली असून 13 प्रवासी जखमी झाले आहेत, त्र्यंबकेश्वर येथे बस उलटल्याने १३ जण जखमी झाले. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस आज त्र्यंबकेश्वरमध्ये उलटली. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून गंगाद्वारजवळ एमटीडीसी रिसॉर्टजवळ हा अपघात झाला. सर्व जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर येथे आज दुपारच्या सुमारास देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांची मिनी बस उलटली असून १३ भक्त जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व जखमी बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असून जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाल्याचे बोलले जात आहे. बसमध्ये एकूण २९ प्रवासी होते. त्यापैकी १३ जण जखमी असून भाविकांनी भरलेली ही बस नाल्यात पलटी होऊन झाडाला अडकल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. यामुळे आज मोठे संकट टळले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम