नाशिक : शहर वाहतूक पोलिसांकडून नाशिकची ग्रामदैवता कालिकामाता यात्रोत्सवानिमित्त महामार्ग बसस्थानक ते गडकरी सिग्नल या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.
श्री कालिकामाता यात्रोत्सवाला सोमवारपासून (ता. २६) सुरुवात झाली आहे. कालिकादेवीच्या दर्शनासाठी येथे नवरात्रात लाखो भाविक येतात. तसेच, यानिमित्त रस्त्याच्या दुतर्फा दुकाने, रहाट पाळणेही दाखल होतात. त्यामुळे दिवसभर दर्शनासाठी, तर रात्री यात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी हजारो भाविक येथे येतात. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात या मार्गावरील वाहनांना प्रवेशबंदी करत इथल्या वाहतूकीत बदल करण्यात आलेले आहेत.
शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी या मार्गांवर संभाव्य वाहतूक कोंडी व होणारी गर्दी टाळण्यासाठी एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या नवरात्रोत्सव काळात कालिका मंदिर परिसरातून होणाऱ्या सर्व प्रकाराच्या वाहतुकीला प्रवेशबंदी केली आहे. तसेच पहाटे ५ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री १२ पर्यंत सदर वाहतूक मार्गात बदल केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम