NIA ला धमकीचा मेल; मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी

0
84

मुंबई : मुंबईला Mumbai पुन्हा दहशतवादी हल्ल्याची Terrorist Attack धमकी देण्यात आलेली आहे. एनआयए (NIA) या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ईमेल आयडीवर याबाबत मेल आला आहे.

NIA कडून मुंबई पोलिसांच्या Mumbai Police नियंत्रण कक्षालाही गुरूवारी रात्री बाराच्या सुमारास हा मेल पाठवण्यात आला आहे. मेल करणाऱ्याने आपण तालिबानी असून तालिबाणी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशावर चालत असल्याचा उल्लेख मेलमध्ये केला आहे. मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्यामुळे तपास यंत्रणेला कसून तयारी करावी लागणार आहे.

धक्कादायक! शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या

मेलनंतर संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागली आहे. हा मेल कुठून व कुणी केला? याचा तपासणी पोलीस करत आहेत. याशिवाय मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, विमानतळ, रेल्वे स्थानक यांच्यासह अनेक ठिकाणी तपासासोबत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. मुंबईत हल्ल्याचा मेल आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here