यंदा दिवाळीत गुळ आणि साखरेचा दर चाळिशी पार; महागाईत दिवाळी गोड कशी?

0
27

द पॉईंट नाऊ:  गूळ, साखरेच्या दराने चाळिशी पार केल्याने ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना गूळ, साखरेच्या वापरात काही प्रमाणात का होईना काटकसर करावी लागणार आहे. मागील काही महिन्यांपासून साखर ४० ते ४२ रुपयांवर, तर गूळ ५५ ते ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे. सेंद्रिय गुळाचा दर तर याहीपेक्षा अधिक असून त्यातही नामांकित कंपन्यांच्या गुळाचा दर तर अधिकच आहे. खाद्य तेलाप्रमाणे गूळ साखरेच्या दरात अचानकपणे वाढ झालेली नाही. मात्र, मागील वर्षांच्या तुलनेत ही वाढ किलोमागे किमान पाच रुपयांची आहे. कधी एक रुपया, कधी दोन रुपये याप्रमाणे या दोन्हीही वस्तुंचे दर वाढत गेले आहेत. यामुळे दिवाळीत साखर, गूळ वापराचा किती याचा विचार सर्वसामान्य गृहिणींना करावा लागणार आहे.

साखर
मागीलवर्षी दिवाळीच्या दरम्यान साखरेचे दर ३५ ते ३८ रुपयांदरम्यान होते. त्यानंतर काही महिने हे दर स्थिर राहिले, मात्र इतर वस्तुंचे दर वाढल्या- नंतर साखरेच्या दरातही रुपया- दोन रुपयांनी वाढ झाली आहे.साखर ३५ वरून ४२ रुपयांवर किरकोळ बाजारात बरेच दिवस साखरेचे दर ३५-३६ रुपये किलोपर्यंत होते. त्यानंतर हळूहळू त्यात वाढ होत गेली. आता साखर ४०-४२ रुपये किलोपर्यंत विकली जात आहे.

गूळ
साध्या गुळाला मागील वर्षी किलोसाठी ५० ते ५५ रुपये ६० रुपये मोजावे लागतात, सेंद्रिय गुळाचा दर किमान ८० रुपये किलो आहे. नावाजलेल्या कंपन्यांचे दर अधिक आहेत.साधा गूळ ६०, तर सेंद्रिय शंभरीपार गुळाच्या दरातही गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. ५०-५५ रुपये किलो असलेला गूळ आता ५५-६० रुपये किलोपर्यंत आहे. | सेंद्रिय गुळाच्या किमती तर | त्याच्या प्रतिनुसार ठरतात. काही कंपन्यांचे दर तर शंभरीपार गेले आहेत.

का वाढले दर?

वाढता वाहतूक खर्च, मेंटन्स, | व्यापाऱ्यांकडील कर्मचाऱ्यांचा खर्च आदी विविध कारणांमुळे गूळ, साखरेच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ एकदम न होता टप्प्या टप्प्याने झाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here