Thirty First | नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या जल्लोषात करण्याची तयारी सुरू असून २०२३ या वर्षाला निरोप देण्यासाठी तरूणाईने जोरदार तयारी केलेली आहे. मात्र, याचवेळी पोलिसांनीही चांगलीच कंबर कसलेली पहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवलीत थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिस हे ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच डोंबिवलीत जागोजागी नाकाबंदी करत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ ही मोहीम पोलिसांनी राबवण्यास सुरवात केली आहे.
Big News | ठाकरे-शिंदे भेटीबाबत ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
सर्वांचा थर्टी फर्स्ट फिवर उतरेपर्यंत ही मोहीम सुरु ठेवण्यात येणार असून पोलिसांकडून बाईक, कार, रिक्षा चालकांसह इतरदेखील वाहन चालकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवताना आढळून आल्यास मोटर वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असून सदर वाहन चालकास दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत दंड भरणे आणि वाहनाचा परवानाही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Thirty First | वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज
नववर्षाचे सुरू होण्यात आता अगदी एक ते दोन दिवस बाकी असताना नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. वर्षाअखेरीस रात्री मद्यपान करून नशेत वाहन चालविल्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतात. वाहनचालकांनी मद्यपानकरून वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी करूनदेखील वाहानचालकांकडून भरधाव वेगात वाहनं चालवली जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडतात आणि आता या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी सर्व वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
Tea | नवऱ्याने गरम चहा मागितला आणि बायकोने त्याच्या डोळ्यातच कात्री खुपसली
पोलिसांची मद्यपींवर चोख नजर असणार
देशासह राज्यात सगळीकडे नविन वर्षाच्या स्वागताची धामधूम असताना, थर्टी फर्स्टच्या जल्लोषांनतर राडा, भांडण तसेच अपघाताच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी मद्यपींविरोधात विशेष मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे. यामुळे राज्यात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांची मद्यपींवर चोख नजर असणार आहे. यामुळे यंदा मद्यपींच्या मस्तीवर आळा बसणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम