Thieves stole tomato carrots : सध्या टोमॅटोला सोन्यासारखा भाव मिळत आहेत. सध्या तर टोमॅटोच्या बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. मात्र, शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील एका शेतकऱ्याचे विक्रीला नेण्यासाठी तोडून ठेवलेले टोमॅटोचे २० कॅरेट चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आलीय. यामुळे या शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान झाले आहे.
शिरूर तालुक्यात राहणाऱ्या अरुण बाळू ढोमे अस या शेतकऱ्याचं नाव असून आजच्या बाजारभावानुसार अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान या घटनेनंतर टाकळी हाजी पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भांडवल उभे करून आपण टोमॅटोची लागवड केली होती. नुकतीच टोमॅटोची तोडणी करून आम्ही सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दर्जेदार मालाची निवड करून टोमॅटोचे कॅरेट्स आपल्या घराजवळ आणून उभे केले होते. मात्र, बुधवारी रात्रीच्या सुमारास गाडी आणि कॅरेट्स व्यवस्थितरित्या लावल्याची खात्री करून झोपलो. परंतु सकाळी उठल्यानंतर गाडीत टोमॅटो भरलेले कॅरेट गायब झाले असल्याचे निदर्शनास आल्याने धक्काच बसला.
दरम्यान टोमॅटोची कॅरेट्स चोरी झाल्याचे निदर्शनास आतयानंतर तातडीने पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप बोंबे यांना घटनेची माहिती देत टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र याठिकाणी चोरीची फिर्याद दाखल केली असून या घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे.
https://thepointnow.in/woman-molested-in-nashik/
शिरूर तालुक्यातील बेट भागात असलेल्या जांबूत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे, शरदवाडी आदि परिसरातून कृषीपंप, ठिबकसंच, केबलचोरी, कृषीयंत्र चोरी अशा स्वरूपाच्या अनेक चोरीच्या घटना याआधी घडलेल्या आहेत. या भागामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले असल्याने पोलिसांनी आता कठोर कारवाई करत चोरीतील गुन्हेगारांना पकडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम