Nashik Crime : चोरांनी Atm मशीनच पळवले नाशिकच्या कायदा सुव्यवस्था प्रश्न पुन्हा ऐरणीवर

0
38

Nashik Crime : नाशिक मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे.पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारी वरचा वचक कमी झालाय का ? असा प्रश्न सध्या सामान्य नाशिककरांकडून विचारला जातोय.

Jammu&Kashmir : पूंछमध्ये लष्कराचे 2 जवान पुरात वाहून गेले

नुकतीच शिंदे गावात घरात घुसून महिलेची हत्या करण्यात आली होती हे प्रकरण ताजे असतानाच आता एटीएम फोडता न आल्याने चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन पळवून नेल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड जवळील सामनगाव रोड परिसरात घडली.

नाशिकरोड येथील आरपीएफ सेंटर जवळच एसबीआय बँकेचे एटीएम आहे. मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ही चोरी केली. पहिल्यांदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र फोडता न आल्याने आरोपींनी थेट एटीएम मशीनच उचलून चोरून नेले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फुटेज मध्ये एक पिकअप व स्विफ्ट कार गाडी या परिसरातून जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

दरम्यान या एटीएम मध्ये किती रक्कम होती यासंदर्भात निश्चित आकडा समजू शकला नाही या घटनेची नाशिक रोड परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट असतो परिणामी या संधीचा फायदा घेऊन सामनगाव रोड परिसरात असलेल्या आरपीएफ सेंटर जवळील एटीएमच चोरट्यांनी चोरून नेले. सदरची घटना सकाळी नागरिकांना समजली.

दरम्यान सततच्या घडणाऱ्या घटनांमुळे नाशिक पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक कमी झाल्याचं चित्र स्पष्ट आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here