द पॉईंट नाऊ: दिवाळीला सुरुवात झाली असून, धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी ग्राहकांना चांगली संधी मिळाली आहे. देशभरात सोन्याचा दर घटला असून, भरपूर ठिकाणी दर ५० हजार रुपये तोळ्याच्या जवळपास आहेत. यंदा देशातील जनतेचा शॉपिंगचा उत्साह पाहता धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी होणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३० ते ३५ टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे.
यंदा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. महिन्याच्या प्रथम आठवडाभरातच सोन्याचे दरात अडीच हजार रुपयांची बढती झाली होती. तरीही दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. याच काळात चांदीदेखील ५७ ते ५८ हजारादरम्यान राहिली. गेल्या दोन तर सोने- चांदीचे भाव पुन्हा कमी कमी होऊ लागले. मागील वर्षी सोन्याचे दर ४७ हजार ७०० रुपये प्रती तोळाच्या आसपास होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे दर घटले
धनत्रयोदशी म्हणजेच सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त जवळ येत असताना सोने चांदी चे भाव कमी होत असल्याने यंदा खरेदी अजून वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव कमी झाल्याने भावात घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर होत असणाऱ्या एकुण विक्रीपैकी सोन्याचा वाटा सुमारे ७० टक्के असतो.
७० टनांपर्यंत यंदा होणार विक्री
• इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात सुमारे ५० टन इतके सोने विविध स्वरूपात विकले गेले होते.
• मागील काही वर्षांपेक्षा यावर्षी हा आकडा ७० टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. २०१९ मध्ये एकूण ३० टन एवढी सोन्याची विक्री झाली होती.
• त्यानंतर कोरोना काळात त्यात मोठी घट झाली. परंतु, मागील दोन वर्षांपासून नागरिकांचा सोने चांदी खरेदीसाठीचा प्रतिसाद चांगला दिसत आहे. भारतात दरवर्षी सुमारे ८०० मेट्रीक टन एव सोने विकले जाते!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम