Breaking news | मराठवाडा-नाशिक पाणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल

0
36
Water reduction
Water reduction

Breaking news | मराठवाडा पाणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आता मोठा निर्णय दिलेला आहे.  नाशिक आणि नगरच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाकडूनही कायम ठेवला आहे. दरम्यान, नाशिक आणि नगरच्या धरणातून आता जायकवाडी धरणात ८.५  टीएमसी इतके पाणी सोडले जाणार आहे.

नगर जिल्ह्यातील प्रवरा कारखाना, संजीवनी कारखाना व शंकरराव काळे या तीन कारखान्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत मारठवड्याला पाणी सोडण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती.  काळे, कोल्हे, विखे पाटील यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज एकत्रित सुनावणी पार पडली. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Onion Rate | लासलगावात लाल कांद्याच्या दरात मोठी वाढ; असे आहेत दर

 फेरविचार करण्याची मागणी

२००५ च्या समन्यायी पाणी वाटप या कायद्यानुसार जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचा विचार करून नगर व नाशिक या जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याचा कायदा हा संमत झाला होता. पण, आता या कायद्यालाच विरोध होत असून कायद्याचा फेरविचार व्हावा, अशी मागणी नगर-नाशिक ह्या जिल्ह्यातून होत आहे.

यावर्षी पावसाळ्यात अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४१० मिमी पाऊस झालाअ हे त्यात धरण पणलोट क्षेत्रात पाऊस जास्त तर लाभक्षेत्रात कमी झाला आहे. नगर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ९६ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून आज मितीला नोव्हेंबर महिन्यात संगमनेरमध्ये एक तर पाथर्डी तालुक्यात आठ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

नगर-नाशिक जिल्ह्यातील शेती धोक्यात 

नगर जिल्हा हा क्षेत्रफळाने मोठा जिल्हा असून मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या तीन मुख्य धरणावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात  १०० टक्के असणाऱ्या या तिन्ही धरणात यंदा तुलनेने कमी पाणीसाठा असून आगामी वर्षभर नियोजन करणे हे मोठं आव्हान असणार आहे. अशात जायकवडीला पाणी सोडले तर नगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील शेती ही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Nashik news | शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात मोठे बदल


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here