नराधमाच्या मुसक्या आवळल्या ; विनयभंग प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा

0
24

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : घरात कुणी नाही हे पाहून त्याचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग व एका महिलेस लाज वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने सहा वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची रक्कम अशी शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हाडा बिल्डींग, वडाळागाव येथे आरोपी हुजेफ रौफ शेख,वय २१, रा. हनुमान मंदिराशेजारी, माळी गल्ली नं २, वडाळागाव, नाशिक याने पीडित मुलीच्या घरात कुणी नसल्याचा फायदा घेत त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

त्यानंतर त्याचा बिल्डिंग मधील राहणाऱ्या एका महिलेच्या समोर लाज वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये बालकांचे लैगिंग अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉस्को व अन्य कायद्या अंतर्गत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एस. बोंडे यांनी करत आरोपीविरुद्ध सर्व पुरावे गोळा करून, गुन्हा सिद्ध होण्याचे दृष्टीने प्रयत्न करून आरोपीविरुद्ध  जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे आरोपपत्र दाखल केले होते.

आरोपीविरुध्द फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष व तपासातून समोर आलेली माहीत हे  सर्व सादर केलेल्या परिस्थितीशी अनुसरून असणाऱ्या पुराव्यास अनुसरून जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०३, नाशिक न्यायमूर्ती  एम. व्ही. भाटीया यांनी आरोपी शेख याला सहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here