द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रात बंड केलेल्या शिंदे गटातील आमदारांबाबत केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता या आमदारांच्या घरी केंद्र सरकार सुरक्षा व्यवस्था पुरवणार आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत जवळपास 40 हुन अधिक आमदारांनी बंड केले. त्यानंतर शिवसेना व या बंड केलेल्या शिंदे गटाकडून एकमेकांना इशारे अन प्रत्युत्तर देणे सुरूच होते. यादरम्यानच्या काळात शिवसैनिकांद्वारे बंड केलेल्या आमदारांच्या कार्यालयावर हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाने आकसापायी बंड केलेल्या आमदारांचे आणि कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याचा आरोप केला होता. मात्र महाराष्ट्र सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते.
दरम्यान, आता शिंदे गटातील 15 आमदारांच्या घरी केंद्र सरकार सुरक्षा व्यवस्था पुरवणार आहे. यातील सदा सरवणकर यांच्या घराबाहेर CRPF चे जवान तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम