खळबळ! जावयाने केली दगडाने ठेचून सासू-सासऱ्यांची हत्या

0
24

द पॉईंट नाऊ ब्युरो : नागपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जावयाने आपल्या सासू-सासऱ्यांची निर्दयतेने कुऱ्हाडीने हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर मधील अमर नगर या परिसरात नरमू यादव या जावयाने सासरे भगवान रेवारे व सासू पुष्पा रेवारे यांची निर्घृण हत्या केली. तर त्याची पत्नी कल्पना व मुलगी मुस्कान या गंभीर जखमी आहेत.

आरोपी नरमू यादव हा त्याच्या पत्नीला मारहाण करत होता. यावेळी त्याच्या सासू – सासऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याने, संतप्त होऊन आरोपीने सासू – सासऱ्यांवर कुऱ्हाडीचे घाव घालत त्यांची निर्घृण हत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सासऱ्यांनी नुकतेच बकऱ्या विकून खूप पैसे आल्याचे नरमू याला कळाले होते. आणि त्याने पत्नी कल्पनाकडे सासरी पैसे मागण्यासाठी तगादा लावला होता. तर नरमू हा सासऱ्यांकडेच राहत होता. शनिवारी पत्नीला पैशांवरून मारहाण करत असताना, त्याचे सासू सासरे आले असता, त्याने सासू – सासाऱ्यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. यावेळी कल्पनाने कुऱ्हाड हिसकवण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यावर आणि मुलीवर देखील नरमूने वार केले. यानंतर सासू-सासाऱ्यांचे डोके दगडाने ठेचून हा पसार झाला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here